सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2024

सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू


मुंबई- विक्रोळी पार्क साईट परिसरात सिलिंडर स्फोटानंतर एका झोपडीला आग लागली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.
 
विक्रोळी पूर्वेकडील संजय गांधी नगर येथील झोपडपट्टीत शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एका झोपडीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामुळे या झोपडीला आग लागली. ही झोपडी संजय गांधी नगर येथील श्रीराम सोसायटीत आहे. आगीमुळे तारांसह घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच, दोघं गंभीर जखमी झाले. आग लागताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पण, अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वीच उपस्थित लोकांनी विजपुरवठा खंडित करुन, पाणी टाकून झोपडीची आग विझवली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेत ४६ वर्षीय धनंजय मिश्रा हे ९९ टक्के भाजले आहेत. तर, ४५ वर्षीय राधेश्याम पांडे हे ९२ टक्के भाजले आहेत. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, यापैकी राधेश्याम पांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS