राज्यात कोणाचे सरकार येणार? सर्वे काय सांगतो? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात कोणाचे सरकार येणार? सर्वे काय सांगतो?

Share This

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. आता मुंबईतील लोकपोल या संस्थेचा सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार महाविकास आघाडीची राज्यांमध्ये सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महायुतीला केवळ 115 ते 118 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Election) 

विभागनिहाय कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार?
मुंबई
एकूण जागा 36
महायुती 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडीचा 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 0 ते 1 जागा मिळू शकते

ठाणे व कोकण विभाग
एकूण जागा 39
महायुती 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडीला 5 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्र
एकूण जागा 58
महायुती 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 1 ते 5 जागा जागा मिळण्याचा अंदाज

मराठवाडा
एकूण जागा 46
महायुती 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात

खानदेश
एकूण जागा 47
महायुती 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना शून्य ते दोन जागा मिळू शकतात

विदर्भ
एकूण जागा 62
महायुती 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज
तर इतरांना 1 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages