पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम नाही

Share This

मुंबई - विधानसभा निवडणूक 2024 साठी विविध यंत्रणांकडील मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यामध्ये समावेश नसल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने कळविले आहे. 

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 15 प्रभागातील मनुष्यबळ मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आला असून यामधील बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार आहेत, असेही निवडणूक शाखेने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages