मेगा प्री-पोल सर्व्हे, महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेगा प्री-पोल सर्व्हे, महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार

Share This


मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -२०२४ (Maharashtra Elections) साठी ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा (Ground Ziro Mega Pree Poll) सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पारडे जड असून महाविकास आघाडीला तब्बल १५७ तर तर महायुतीला (Mahayuti) केवळ ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात सत्ता बदल होणार असे चित्र दिसत आहे.

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत केवळ २३ जागा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महायुतीत पुन्हा एकदा सर्वांधिक जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीत काँग्रेस मुसंडी मारण्याच्या तयारीत दिसून येत असून काँग्रेसला ६८ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार ४४ आणि शिवसेना ठाकरे गटाला ४१ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही ४ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सर्व्हेमधून दिसून येत आहे.

सर्व्हेचे निष्कर्ष -

मविआ – १५७
– काँग्रेस : ६८
– राष्ट्रवादी-शप : ४४
– शिवसेना यूबीटी : ४१
– एसपी : ०१
– सीपीआय-एम : ०१
– पीडब्ल्यूपी : ०२

महायुती – ११७
– भाजप : ७९
– शिंदे सेना : २३
– राष्ट्रवादी-अजित पवार : १४
– आरवायएसपी : ०१

इतर - १४

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages