मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या (१९ ऑगस्ट) सुटी जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2025

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या (१९ ऑगस्ट) सुटी जाहीर


मुंबई - भारतीय हवामान खात्याकडून उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS