रेलवे बोर्ड मुख्यालयात ‘संविधान दिन’ गौरवपूर्ण वातावरणात साजरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2025

रेलवे बोर्ड मुख्यालयात ‘संविधान दिन’ गौरवपूर्ण वातावरणात साजरा


नवी दिल्ली - 'संविधान दिन' निमित्त रेल भवन येथील रेल्वे बोर्ड मुख्यालयात बुधवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या गरिमामय समारंभात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सतीश कुमार यांनी वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

संविधानाबद्दल नव्याने दृढ केला संकल्प
सकाळी 11 वाजता बोर्डाच्या परिषद कक्षात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी अध्यक्ष सतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या संविधानातील मूलभूत मूल्यांचे पालन करण्याचा, तसेच राष्ट्राची एकता व अखंडता जपण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला.

डिजिटल माध्यमांतूनही सहभागाला प्रोत्साहन - 
रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्रत्यक्ष कार्यक्रमासह डिजिटल माध्यमातूनही संविधान दिन साजरा करण्यावर भर देण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांना MyGov.in आणि constitution75.com या संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या ‘संवैधानिक लोकशाही’ विषयक ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन करून प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

संविधान दिनाचे महत्त्व - 
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने संविधान औपचारिकरित्या स्वीकारले होते. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. भारतीय रेल्वेच्या वतीने झालेले हे आयोजन देशाच्या लोकशाही परंपरा आणि संवैधानिक मूल्यांप्रतीची निष्ठा अधोरेखित करणारे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS