घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणाने बाधित होणाऱ्या २४ बांधकामांवर तोडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2025

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणाने बाधित होणाऱ्या २४ बांधकामांवर तोडक कारवाई


मुंबई - घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या २४ बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने आज (दिनांक १३ नोव्हेंबर २०२५) निष्कासन करण्यात आले. तसेच, या जोड मार्गावरील नवीन  उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्या ३५ बांधकामांच्या निष्कासनाची कारवाई प्रगतिपथावर आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घाटकोपर (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यान १५.२५ मीटर रुंदीचा विकास नियोजित रस्ता बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या २४ बांधकामांचे आज निष्कासन करण्यात आले. 

तसेच, याच परिसरात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) यांच्याकडून नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान बाधित होणाऱ्या ३५ बांधकामांचे निष्कासन करण्याची कारवाईदेखील प्रगतिपथावर आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा ठरणाऱ्या मालमत्ताधारकांना रितसर सूचना देऊन तसेच नुकसानभरपाई देऊन त्यानंतर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS