मुंबईतील पॉश इमारतीला आग, बॉलिवूड निर्माता संदीप सिंह थोडक्यात बचावले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2025

मुंबईतील पॉश इमारतीला आग, बॉलिवूड निर्माता संदीप सिंह थोडक्यात बचावले

 

मुंबई - मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील गगनचुंबी आणि पॉश इमारतींमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सकाळी अंधेरी वेस्ट येथील २३ मजली सोरेंटो टॉवरला भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने १२व्या, १३व्या आणि १४व्या मजल्यावर मोठा गोंधळ उडाला.

या आगीत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते संदीप सिंह यांच्या घरालाही आग लागली. संदीप सिंह यांचे घर सोरेंटो सोसायटीच्या १४व्या मजल्यावर असून, सुदैवाने या घटनेत त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सोरेंटो टॉवरमध्ये आग लागली. आगीमुळे इमारतीतील इलेक्ट्रिकल डक्ट आणि केबल्स जळून खाक झाल्या. त्यामुळे काही वेळातच संपूर्ण इमारतीत दाट धुराचे साम्राज्य पसरले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची मदत
या घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संदीप सिंह यांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढून आपल्या घरी नेले. संदीप सिंह यांच्यावर नुकतेच हर्नियाचे ऑपरेशन झाले असल्याने ही घटना अधिक चिंताजनक ठरली होती. मात्र, त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, अंकिता, विकी आणि संदीप यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या मदतीचे कौतुक केले आहे. इमारतीतील इतर रहिवाशांनाही पायऱ्यांद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS