आर्थिक अडचणीतल्या बेस्टला पुन्हा महापालिकेचा आधार; 1 हजार कोटींचे अनुदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 February 2026

आर्थिक अडचणीतल्या बेस्टला पुन्हा महापालिकेचा आधार; 1 हजार कोटींचे अनुदान


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून बेस्ट (BEST) उपक्रमाला आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात बेस्टसाठी 1,000 कोटी रुपयांचे अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे. (BMC Budget 2026-27)

महापालिकेकडून 2012-13 पासून सातत्याने बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. जानेवारी 2026 पर्यंत महापालिकेने बेस्टला एकूण 12,028.81 कोटी रुपयांची मदत दिली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही मदत महत्त्वाची मानली जाते.

दरम्यान, महापालिकेवर सध्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मोठा आर्थिक भार आहे. तरीदेखील बेस्टची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन 2026-27 या वर्षासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद अनुदान स्वरूपात करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी बेस्ट ही जीवनवाहिनी मानली जाते. वाढते इंधन दर, ताफ्याचा खर्च आणि महसुलातील तूट या पार्श्वभूमीवर महापालिकेची ही मदत बेस्टसाठी दिलासादायक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS