BEST च्या आर्थिक स्थैर्यासाठी ३ हजार कोटींचे अनुदान द्या, तृष्णा विश्वासराव यांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 March 2026

BEST च्या आर्थिक स्थैर्यासाठी ३ हजार कोटींचे अनुदान द्या, तृष्णा विश्वासराव यांची मागणी


मुंबई - मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थैर्यासाठी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट उपक्रमाने सुमारे ३,९४१.०७ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी केवळ १,००० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार बेस्ट उपक्रमाला दरमहा सुमारे ८३.३३ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

मात्र बस ताफ्याच्या आधुनिकीकरणासाठी होणारा खर्च, सेवामुक्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके तसेच बेस्टचा दैनंदिन आर्थिक कारभार सुरळीत ठेवण्यासाठी ही रक्कम अपुरी ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मुंबईकरांना अधिक चांगली व सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाला किमान ३,००० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल, असेही तृष्णा विश्वासराव यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS