बेस्ट डेपोत शूटिंगसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग शुल्कात १० टक्क्यांची वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 March 2026

बेस्ट डेपोत शूटिंगसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग शुल्कात १० टक्क्यांची वाढ


मुंबई - बेस्ट उपक्रमाचे डेपो, बस स्थानक याठिकाणी शुटींगसाठी वाहने येतात. मात्र यापुढे शुटींगसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. आता दरवर्षी पार्किंग शुल्कात १० टक्क्यांनी वाढ करण्यास बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या बसेसना प्रवासी पसंती देतात. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमाचे डेपो, बस स्थानक याठिकाणी शुटींग करण्यास चित्रपट निर्माते पसंती देतात. चित्रीकरणासाठी येणाऱ्या वाहनांना बस स्थानकात व बस आगारात पार्किंगचे पैसे द्यावे लागतात. चित्रीकरण करण्यासाठी आकारण्यात येणारी शुल्क व सुरक्षा अनामत ठेव याकरता यापूर्वी २०१४ साली संमती दिली होती व प्रत्येक वर्षांनी त्यात दहा टक्के वाढ होईल असे प्रस्तावित करण्यात आले होते. शुल्क आकारणीचा कालावधी ३१ मार्च २०२५ साली संपला होता. परंतु आता पार्किंग शुल्क आकारणीचा कालावधी २०३० असून प्रत्येक वर्षांनी दहा टक्क्यांची वाढ होणार आहे. तसेच अनामत रक्कम ४० हजार असून यात कोणतीही वाढ होणार नाही.

बेस्ट बस आगार व बस स्थानकाच्या आसपास चित्रीकरण करतेवेळी पार्किंग उपलब्ध नसल्याने बेस्टच्या बस स्थानकात व आगारात पार्किंगसाठी बेस्ट कडे परवानगी मागावी लागते आणि चित्रीकरणाच्या वाहनांना ते अँड पार्कच्या दरानुसार दर लावले जातात. मात्र यापुढे चित्रीकरणाच्या वाहनांना नवीन दर लावले जातील. त्यानुसार चित्रीकरणाच्या व्हॅनिटी वॅन, जनरेटर व्हॅन व अन्न पुरवणारे वाहन ट्रक यांना दिवसाला पाच हजार रुपये आकारले जाणार असून अभिनेत्यांच्या खाजगी वाहनांना एक हजार रुपये आकारले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS