भाजपच्या आरे कॉलनीतील साडी वॉकाथॉनमध्ये धावल्या हजारो महिला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपच्या आरे कॉलनीतील साडी वॉकाथॉनमध्ये धावल्या हजारो महिला

Share This

मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्ष (भाजप) महिला मोर्चा  जिल्हाध्यक्षा, नगरसेविका प्रिती सातम  यांच्या संकल्पना आणि नेतृत्वाखालीआयोजित करण्यात आलेल्या ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’ या उपक्रमाला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वॉकाथॉनमध्ये एक हजारांहून अधिक माता-भगिनींनी पारंपरिक साडी नेसून उत्साहात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सकाळी ६ वाजता आरे चेक नाका जवळील वाघदेवी मंदिर परिसरातील युनिट १० मैदानातून  वॉकाथॉनला सुरुवात झाली. हजारो महिलांनी साडी नेसून आरोग्य, उत्साह आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवत या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना आमदार अमित साटम यांनी म्हणाले की, ‘तिच्या पावलात शक्ती’ हे ब्रीदवाक्य आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरले. महिलांचे आरोग्य, त्यांचा उत्साह आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा महिला मोर्चातर्फे करण्यात आले होते. या संदर्भात माहिती देताना उत्तर-पश्चिम जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि नगरसेविका प्रिती सातम यांनी सांगितले की, महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांची एकजूट आणि पारंपरिक संस्कृती जपण्याच्या उद्देशाने हा साडी वॉकथॉन आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला महिलांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंददायी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या उत्तर  पश्चिम जिल्ह्यातील महिला मोर्चाचे विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages