मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरींची शक्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2026

मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरींची शक्यता


मुंबई, दि. ३० : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या २४ तासांत (२९ जून सकाळी ८ ते ३० जून सकाळी ८) मुंबई शहरात २६.०३ मिमी, पूर्व उपनगरात ४०.६२ मिमी, तर पश्चिम उपनगरात २२.४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.

आज दुपारी १२.३५ वाजता ४.१६ मीटरची उच्च भरती अपेक्षित असून, त्यानंतर सायंकाळी ६.४४ वाजता २.०१ मीटरची ओहोटी असेल. तसेच १ जुलै रोजी पहाटे १२.२० वाजता ३.६१ मीटरची उच्च भरती आणि सकाळी ६.०७ वाजता ०.७६ मीटरची ओहोटी राहणार आहे.

जोरदार पाऊस आणि भरतीचा कालावधी लक्षात घेता सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS