चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2026

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू


मुंबई, ३० जून: चेंबूरमधील रोड क्रमांक ११, हेरिटेज प्राईड परिसरात मंगळवारी दुपारी शाळेच्या बसवर रस्त्यालगतचे पिंपळाचे झाड उन्मळून पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात ११ वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला असून अन्य चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, दुपारी २:५८ वाजता या घटनेची माहिती मिळाली. युनिव्हर्सल हायस्कूलची MH-03/CV-7439 क्रमांकाची मेक फोर्स कंपनीची शाळेची बस जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले पिंपळाचे झाड उन्मळून थेट बसवर कोसळले.

घटनेनंतर बसमधील १२ विद्यार्थ्यांना बसच्या वाहकाने आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने सुरक्षित बाहेर काढले. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याला दुपारी ४:२३ वाजता मृत घोषित करण्यात आले. उर्वरित चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य पूर्ण केले. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS