मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2026

मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा


मुंबई, 29 जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी सोमवार (29 जून) ऑरेंज अलर्ट जारी केला असून, शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवसही शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

28 जून ते 29 जून सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत मुंबई शहरात 37.50 मिमी, पूर्व उपनगरात 113.27 मिमी तर पश्चिम उपनगरात 84.27 मिमी पावसाची नोंद झाली.

याशिवाय, 29 जून रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 या चार तासांच्या कालावधीत अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहर विभागातील एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयात 53.4 मिमी, रावळी कॅम्प येथे 46.72 मिमी, दादर अग्निशमन केंद्रात 45.6 मिमी, मालबार हिल येथे 37.2 मिमी आणि नायर रुग्णालय परिसरात 33.77 मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस वर्सोवा WWTF अँड लॅगून्स येथे 156.8 मिमी, वर्सोवा पंपिंग स्टेशन 121.6 मिमी, मारोल अग्निशमन केंद्र 108.4 मिमी, ओशिवरा प्रतिक्षा नगर महानगरपालिका शाळा 108 मिमी आणि मालपा डोंगरी, अंधेरी येथील महानगरपालिका शाळेत 104 मिमी नोंदविण्यात आला.

पूर्व उपनगरात मुलुंड येथील वीणा नगर महानगरपालिका शाळेत 160.4 मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली. त्याखालोखाल मानखुर्द महाराष्ट्र नगर शाळा 123.4 मिमी, पवई पसपोली महानगरपालिका शाळा 122 मिमी, मिथागर, मुलुंड 120.8 मिमी आणि एस वॉर्ड कार्यालय 120.6 मिमी पावसाची नोंद झाली.

सततच्या पावसामुळे मुलुंड, भांडुप, घाटकोपर, मालाड पूर्व, मालवणी आणि अंधेरी पश्चिम येथे पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच शॉर्ट सर्किटच्या 16, झाडे व फांद्या पडण्याच्या 34 आणि भिंती अथवा घरे कोसळण्याच्या 3 घटना नोंदविण्यात आल्या.

तथापि, पावसाचा जोर असूनही मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages