जुहूतील उघड्या नाल्यात पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2026

जुहूतील उघड्या नाल्यात पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू


मुंबई २७ जून : अंधेरी पश्चिम येथील जुहूच्या जेव्हीपीडी (JVPD) परिसरात उघड्या नाल्यात पडल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२७ जून) दुपारी घडली.

महापालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी १२.०९ वाजता जेव्हीपीडी स्कीम, व्ही. पी. मार्ग येथील उघड्या नाल्यात एक तरुण पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला नाल्यातून बाहेर काढले.

संबंधित तरुणाची ओळख निहाल नाझिम मिर्झा (वय २४) अशी झाली आहे. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages