
मुंबई - कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला असून तो https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यांबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी; तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कामगार व्यवस्थेला अधिक पादरर्शक, सुसंगत आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी केंद्र शासनाने 21 नोव्हेंबर 2025 पासून चार महत्वपूर्ण कामगार संहितांची अंमलबजावणी संपूर्ण भारतात सुरू केली आहे. यामध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहीता 2020 तसेच व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व कामाची स्थिती संहिता 2020 यांचा समावेश आहे. या सर्व संहितांमध्ये विद्यमान 29 कायदे एकत्र अरण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता नियमांचा मसुदा https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. संबंधित सूचना अथवा हरकती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत कामगार आयुक्त कार्यालय, कामागर भवन, बांद्रा – कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051 या पत्त्यावर पाठवाव्यात; तसेच mh-labourcodes@gmail.com या ईमेलवरही सूचना, हरकती स्वीकारल्या जाणार आहेत, असे मुंबई शहरचे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Post Top Ad
15 June 2026
नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदवाव्यात
Tags
# महाराष्ट्र
# मुंबई
Share This
About JPN NEWS
मुंबई
Tags:
महाराष्ट्र,
मुंबई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment