कुर्ल्यातील शीतल तलावात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 July 2026

कुर्ल्यातील शीतल तलावात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू


मुंबई | जेपीएन न्यूज -
कुर्ला (पश्चिम) येथील एल.बी.एस. मार्गावरील शीतल तलावात शुक्रवारी १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, एनडीआरएफ आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावातून तरुणाला बाहेर काढून तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. मृत तरुणाची ओळख आदित्य दिलीप तायडे (वय १९) अशी झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS