उघड्या, तुटलेल्या मॅनहोलच्या तक्रारीसाठी BMC कडून स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2026

उघड्या, तुटलेल्या मॅनहोलच्या तक्रारीसाठी BMC कडून स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट सुरू


मुंबई | जेपीएन न्यूज - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उघडे, तुटलेले किंवा गायब झालेल्या मॅनहोल कव्हरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट (9324500600) सुरू केला आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना मॅनहोलसंबंधी तक्रारी तत्काळ नोंदवता येणार असून त्यांचे जलद निवारण केले जाणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून "तक्रार सबमिट करा" हा पर्याय निवडावा. त्यानंतर घटनास्थळाचे लोकेशन आणि समस्येचे छायाचित्र अपलोड केल्यानंतर तक्रार नोंदणी क्रमांक मिळणार असून त्याद्वारे तक्रारीचा पाठपुरावा करता येईल.

याशिवाय 'माय बीएमसी मार्ग' मोबाईल ॲप, महापालिकेचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट (8999228999), अधिकृत संकेतस्थळ portal.mcgm.gov.in तसेच 1916 हेल्पलाईनद्वारेही नागरिकांना तक्रारी नोंदवता येतील.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर अथवा इतर धोकादायक नागरी समस्या आढळल्यास तात्काळ उपलब्ध डिजिटल माध्यमांचा वापर करून माहिती द्यावी, जेणेकरून त्वरित कारवाई करून अपघात टाळता येतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS