'लोकराज्य' मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो उलटा; डॉ. नितीन राऊत आक्रमक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2026

'लोकराज्य' मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो उलटा; डॉ. नितीन राऊत आक्रमक


मुंबई | जेपीएन न्यूज - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत 'लोकराज्य' मासिकाच्या एप्रिल २०२६ अंकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र उलट्या स्वरूपात प्रसिद्ध झाल्याचा प्रकार विधानसभेत गुरुवारी गाजला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉ. नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली.

डॉ. राऊत यांनी हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून महामानवांचा अपमान असल्याचा आरोप केला. शासकीय प्रकाशनात अशी गंभीर चूक होणे अत्यंत निष्काळजीपणाचे असल्याचे सांगत त्यांनी संबंधित संपादक, अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच बाजारातील सर्व छापील अंक मागे घेऊन नष्ट करावेत आणि ऑनलाइन पीडीएफ आवृत्ती तातडीने हटवावी, अशीही मागणी त्यांनी केली.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तातडीने दखल घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाल्याचे मान्य करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून २४ तासांच्या आत कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

या घटनेनंतर शासकीय प्रकाशनातील निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, आता दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS