वारंवार गैरहजेरी भोवली, भाजप नगरसेवक आकाश पुरोहितांना थेट न्यायालयीन कोठडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2026

वारंवार गैरहजेरी भोवली, भाजप नगरसेवक आकाश पुरोहितांना थेट न्यायालयीन कोठडी


मुंबई - JPN NEWS - 
भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा धक्का देत थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने यापूर्वी बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंट (NBW) रद्द करण्याची त्यांची मागणी फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

माहितीनुसार, २०२० मध्ये वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांना रोखून धरणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलिसांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सुमारे २० जणांवर आरोप आहेत.

या प्रकरणातील अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविणे आणि आरोपींची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेसाठी न्यायालयाने आकाश पुरोहित यांना अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, वारंवार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

यानंतर पुरोहित यांनी सत्र न्यायालयात हजर राहत वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत थेट अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

आता आकाश पुरोहित न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS