पुढील पाच दिवस राज्यात विजांचा कडकडाट; काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2026

पुढील पाच दिवस राज्यात विजांचा कडकडाट; काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई / JPN NEWS / दि. १ ऑगस्ट : 
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

१ ऑगस्ट रोजी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, नाशिकच्या घाट परिसरासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२ ऑगस्ट रोजी रायगड, पुणे आणि साताराच्या घाट परिसरात, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, साताराच्या घाट परिसरासह बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर ४ ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

५ ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांमध्ये अधूनमधून पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना पावसाच्या आणि विजांच्या कडकडाटाच्या काळात अनावश्यक प्रवास टाळण्याचे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS