मुलुंडमध्ये BEST बस आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक; चालक जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2026

मुलुंडमध्ये BEST बस आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक; चालक जखमी


मुंबई JPN NEWS - मेट्रोच्या कामामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेल्या मुलुंडमधील Raily Wolf परिसरात BEST बस आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक झाली. रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे सुमारे ५.५० वाजता झालेल्या या अपघातात BEST बसचालक संदीप नामदेव करांडे (४०) जखमी झाले. त्यांच्यावर Agarwal Hospital येथे उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Majas (Mateshwari) डेपोची Route No. 496/31 वरील BEST बस (MH-01-DR-5024) SEEPZ येथून Teen Hath Nakaच्या दिशेने जात होती. Raily Wolf परिसरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल करून एकेरी मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या MH-09-FL-1044 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स बसची BEST बसला समोरासमोर धडक झाली.

या धडकेत BEST बसचालक करांडे यांच्या पोटाला स्टेअरिंगचा जोरदार धक्का बसला. तसेच त्यांच्या उजव्या पायाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर BEST बसच्या बोनेटच्या भागात आग लागली. बस वाहकाने तत्काळ बसमधील अग्निशामक यंत्राचा वापर करून आग विझवली. दरम्यान, प्रवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली होती.

जखमी चालकाला बस वाहकाने Agarwal Hospital येथे उपचारासाठी दाखल केले. चालक शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक अधिकारी खांडे, वाहतूक अधिकारी शिरसाठ, अपघात निरीक्षक क्रमांक ७३ आणि मुलुंड येथील बस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी LM Lorry/Recker आणि आवश्यक यांत्रिक मदत मागविण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS