मुख्य लिपिक पदासाठी खात्यांतर्गत परीक्षेचे परिपत्रक जारी, पात्र कार्यकारी सहाय्यकांना अर्ज करण्याचे कामगार सेनेचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2026

मुख्य लिपिक पदासाठी खात्यांतर्गत परीक्षेचे परिपत्रक जारी, पात्र कार्यकारी सहाय्यकांना अर्ज करण्याचे कामगार सेनेचे आवाहन


मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेतील ‘मुख्य लिपिक (अर्हताधारक)’ पदासाठी खात्यांतर्गत परीक्षेचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे परिपत्रक निर्गमित झाल्याचा दावा संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केला आहे.

महापालिकेतील पात्र कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम-लिपिक) यांनी विहित मुदतीत खात्यांतर्गत परीक्षेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन संघटनेने केले आहे.

दरम्यान, या मुद्यावरून म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने ‘दि म्युनिसिपल युनियन’वर टीका केली आहे. मुख्य लिपिक पदाची परीक्षा रद्द करून लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन सभासद आणि वर्गणीदारांची दिशाभूल केल्याचा आरोप कामगार सेनेने केला आहे.

मुख्य लिपिक पदासाठी आता खात्यांतर्गत परीक्षेचे परिपत्रक जारी झाल्याने संबंधित संघटनेच्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट झाल्याचेही डॉ. कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे.

लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची वेळ आली असून, कर्मचाऱ्यांनी आपल्या हिताचा विचार करून योग्य भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS