CSMT यार्डमध्ये हावडा एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारला आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2026

CSMT यार्डमध्ये हावडा एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारला आग


मुंबई JPN NEWS - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) यार्डमध्ये उभ्या असलेल्या १२२६१ CSMT–हावडा एक्सप्रेसच्या रिकाम्या रेकमधील पॅन्ट्री कारला आग लागल्याची घटना पहाटे घडली. पॅन्ट्री कार क्रमांक SCR/192967 मध्ये पहाटे सुमारे ३.४० वाजता आग लागल्याचे समोर आले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. फायर ब्रिगेडचे पथक पहाटे ४.०१ वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. ४.०५ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, आग लागली त्यावेळी संबंधित रेक रिकामी होती. त्यामुळे रेकमध्ये कोणताही प्रवासी उपस्थित नव्हता. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला का, याबाबतही अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS