मानखुर्दमध्ये चार पादचाऱ्यांना वाचवताना बेस्ट बस मेट्रोच्या खांबाला धडकली; प्रवासी जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2026

मानखुर्दमध्ये चार पादचाऱ्यांना वाचवताना बेस्ट बस मेट्रोच्या खांबाला धडकली; प्रवासी जखमी


मुंबई JPN NEWS - मानखुर्द स्टेशन पुलावर चार पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बेस्ट बस मेट्रो स्थानकाच्या खांबाला धडकली. या अपघातात बसमधील एक प्रवासी जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, माटेश्वरीच्या प्रतीक्षानगर आगाराची बस क्रमांक ८०५७ (MH-01-EM-2767) ऐरोली बस स्थानकातून प्रतीक्षानगर आगाराच्या दिशेने जात होती. मानखुर्द स्टेशन पुलावर बस पोहोचली असता चार पादचारी अचानक डाव्या बाजूने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले.

पादचाऱ्यांना धडक लागू नये यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यावेळी बसवरील नियंत्रण बिघडून बस मानखुर्द मेट्रो स्थानकाच्या खांबाला जाऊन धडकली.

या धडकेत बसमधील एका प्रवाशाच्या डाव्या मनगटाला आणि डाव्या मांडीला दुखापत झाली. जखमी प्रवाशाने तत्काळ आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि उपचारासाठी सायन रुग्णालयात रवाना झाला.

अपघातानंतर बसचालक आणि वाहक मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल झाले. PSI गिरीश साठे यांनी बस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. जखमी प्रवासी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पुढील चौकशी करून गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी अपघातग्रस्त बस घटनास्थळावरून हटवण्यास परवानगी दिल्यानंतर चालकाने बेस्टच्या टोईंग वाहनाची व्यवस्था केली. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता बस प्रतीक्षानगर आगारात नेण्यात आली. या घटनेप्रकरणी पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS