Mumbai मुंबईकरांच्या आहारात प्रथिनांची कमतरता, महागाई आणि पर्यायांचा अभाव प्रमुख अडथळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

15 October 2026

Mumbai मुंबईकरांच्या आहारात प्रथिनांची कमतरता, महागाई आणि पर्यायांचा अभाव प्रमुख अडथळे


मुंबई JPN NEWS - पोषणाविषयी जागरूकता वाढत असली, तरी दैनंदिन आहारातून पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि फायबर मिळविण्याचे आव्हान कायम असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. पेप्सिको इंडिया, युरोमॉनिटर इंटरनॅशनल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, मुंबईतील ६९ टक्के प्रतिसादकर्ते दररोज ४१ ग्रॅमपेक्षा कमी प्रथिनांचे सेवन करतात. पुरेशा प्रमाणात प्रथिने घेण्यात ६२ टक्के मुंबईकरांनी अधिक किंमत हा प्रमुख अडथळा असल्याचे सांगितले. तर ७१ टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते, सोयीस्कर आणि विश्वासार्ह फायबरयुक्त खाद्यपदार्थांचे पर्याय पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.

‘द स्टेट ऑफ प्रोटीन अँड फायबर इन अर्बन इंडिया’ या शीर्षकाखाली हा अभ्यास करण्यात आला. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि कोची या पाच शहरांमधील १८ ते ५० वर्षे वयोगटातील एकूण १,२५० जणांचा सर्वेक्षणात समावेश होता. शहरी भारतातील एकूण निष्कर्षांनुसार, ७० टक्के प्रतिसादकर्ते दररोज ४१ ग्रॅमपेक्षा कमी प्रथिनांचे सेवन करतात, तर ६१ टक्के जणांचे फायबरचे सेवन शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणापेक्षा कमी आहे.

जागरूकता असूनही अचूक माहितीचा अभाव - 
मुंबईतील ७० टक्के प्रतिसादकर्त्यांनी प्रथिनांच्या गरजेबाबत जागरूक असल्याचे सांगितले. मात्र, जागरूकता असूनही दैनंदिन गरजेचे अचूक प्रमाण माहीत नसल्याची बाब अभ्यासात अधोरेखित झाली आहे. पाच शहरांतील एकत्रित निष्कर्षांनुसार, ७४ टक्के ग्राहकांनी प्रथिनांच्या गरजेबाबत जागरूक असल्याचे सांगितले, परंतु ५६ टक्के ग्राहकांकडे याबाबत अचूक माहिती नव्हती.

फायबरच्या बाबतीत माहितीची दरी आणखी मोठी असल्याचे दिसून आले. एकूण प्रतिसादकर्त्यांपैकी ५९ टक्के जणांनी फायबरच्या दैनंदिन गरजेबाबत माहिती असल्याचे सांगितले; मात्र ८९ टक्के जणांना आवश्यक प्रमाण अचूकपणे सांगता आले नाही. केवळ ११ टक्के प्रतिसादकर्ते शिफारस केलेले प्रमाण अचूक ओळखू शकले.

किंमत आणि सोयीस्कर पर्यायांची कमतरता -
पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळविण्यात अधिक किंमत आणि सहज उपलब्ध पर्यायांचा अभाव हे महत्त्वाचे अडथळे असल्याचे अभ्यासातून समोर आले. पाच शहरांतील एकत्रित निष्कर्षांनुसार, ६० टक्के ग्राहकांनी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांची किंमत, तर ५७ टक्के ग्राहकांनी सोयीस्कर आणि विश्वासार्ह पर्यायांची कमतरता ही प्रमुख कारणे असल्याचे नमूद केले.

फायबरयुक्त खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेबाबतही अशीच स्थिती आहे. एकूण ६९ टक्के प्रतिसादकर्त्यांना सोयीस्कर आणि विश्वासार्ह फायबरयुक्त पर्याय पुरेसे उपलब्ध नसल्याचे वाटते. कोचीमध्ये हे प्रमाण ७४ टक्के, कोलकात्यात ७२ टक्के आणि मुंबईत ७१ टक्के नोंदविण्यात आले.

दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश करण्याची इच्छा -
प्रथिने आणि फायबर यांचा आहारात सहज समावेश करता यावा, अशी ग्राहकांची अपेक्षा असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. विविध वयोगटांतील सुमारे १० पैकी ९ ग्राहकांना नियमित आहारात प्रथिनांचा समावेश करणे अधिक सोपे व्हावे असे वाटते. तसेच ८९ टक्के ग्राहकांनी परिचित आणि दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांच्या स्वरूपात प्रथिने उपलब्ध व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जनरेशन झेडमधील ८९ टक्के प्रतिसादकर्त्यांना दैनंदिन आहारात प्रथिने सहजपणे समाविष्ट करता यावीत असे वाटते, तर ९० टक्के जणांना परिचित खाद्यपदार्थांच्या माध्यमातून प्रथिने मिळावीत अशी अपेक्षा आहे. फायबरच्या सेवनातील कमतरता विविध पिढ्यांमध्येही दिसून आली. जनरेशन एक्समध्ये ६५ टक्के, तर जनरेशन झेड आणि मिलेनियल्समध्ये प्रत्येकी ५८ टक्के प्रतिसादकर्त्यांचे फायबरचे सेवन शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले.

पोषणविषयक माहिती आणि प्रत्यक्ष आहारातील निवडी यांतील दरी - 
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात या अभ्यासाचे निष्कर्ष सादर करण्यात आले. यावेळी पोषण, सार्वजनिक आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. पोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच ग्राहकांना दैनंदिन आहारात योग्य पर्याय निवडणे सोपे व्हावे, यावर चर्चेत भर देण्यात आला.

पेप्सिको इंडियाच्या संशोधन व विकास विभागातील लाइफसायन्सेसच्या संचालक आणि इंडिया आर अँड डी साइट लीड डॉ. अंकिता मारवाहा यांनी सांगितले की, ग्राहक आरोग्य आणि पोषणाला अधिक महत्त्व देत असले, तरी केवळ जागरूकता पुरेशी नाही. पोषणाविषयीची विश्वासार्ह माहिती प्रत्यक्ष आहारातील योग्य निवडींमध्ये रूपांतरित होण्यासाठी ग्राहकांना मदत करणे आवश्यक आहे. प्रथिने आणि फायबरबाबत जागरूकता, अचूक समज आणि प्रत्यक्ष कृती यांतील दरी या अभ्यासातून स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युरोमॉनिटर इंटरनॅशनलचे वरिष्ठ सल्लागार दिलीप राधाकृष्ण यांच्या मते, प्रथिने आणि फायबरबाबत ग्राहकांची रुची असली, तरी दैनंदिन गरजांविषयीची माहिती नेहमीच अचूक नसते. विशेषतः फायबरच्या बाबतीत ही तफावत अधिक दिसून येते. त्यामुळे पोषणविषयक संवादातून केवळ जागरूकता वाढविण्याऐवजी, किती पोषण आवश्यक आहे आणि दैनंदिन खाद्यपदार्थांच्या निवडींतून ते कसे मिळवता येईल, याची स्पष्ट माहिती देणे महत्त्वाचे आहे.

या अभ्यासातून शहरी भागातील ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत, सहज उपलब्ध आणि दैनंदिन आहारात समाविष्ट करता येतील असे पोषणयुक्त पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS