Kalyan बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न सामोपचाराने सोडवा - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2026

Kalyan बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न सामोपचाराने सोडवा - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे


मुंबई JPN NEWS - कल्याण तालुक्यातील मौजे चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न सामोपचाराने सोडवून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्राच्या विकासाबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जमिनीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

संबंधित जमीन कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने देण्याबाबत तसेच त्यासंदर्भातील नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, विकासकामांमुळे बुद्धभूमी फाउंडेशनचे काही नुकसान झाले असल्यास त्याची भरपाई संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीस कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांचे संबंधित अधिकारी आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पार्श्वभूमी : 
कल्याणमधील वालधुनी-अशोकनगर परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न विकासकामांमुळे चर्चेत आला आहे. उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बुद्धमूर्ती व धार्मिक संरचना हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जमिनीचा प्रश्न सामोपचाराने सोडवणे, कायमस्वरूपी भाडेपट्ट्याचा प्रस्ताव सादर करणे आणि संभाव्य नुकसानभरपाईबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS