Mumbai BEST बस आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2026

Mumbai BEST बस आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान


मुंबई JPN NEWS : दक्षिण मुंबईतील वाय. बी. चव्हाण बस थांब्याजवळ रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी टाटा वेट लीजची बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

मिळालेल्या अपघात अहवालानुसार, बेस्टच्या बॅकबे आगारातील बस क्रमांक ६२६६ (MH-01-DR-1326) ही रविवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता राखीव बस म्हणून बॅकबे आगारातून चर्चगेटच्या दिशेने जात होती. वाय. बी. चव्हाण बस थांब्याजवळ समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारची बसच्या पुढील उजव्या बाजूला जोरदार धडक बसली.

धडकेमुळे बसच्या पुढील उजव्या बाजूचे बॉडी पॅनेल फाटून मोठे नुकसान झाले. बसची पुढील काच फुटली, चालकाच्या दरवाजाखालील पायरी तुटली आणि स्टिअरिंग रॉडचेही नुकसान झाले. दुसरीकडे, स्कॉर्पिओच्या पुढील उजव्या बाजूचा भाग पूर्णपणे खराब झाला. तिची पुढील काच फुटली, उजव्या बाजूचे पुढील चाक निखळले तसेच दरवाजा आणि बोनेटचेही नुकसान झाले.

अपघातापूर्वी बसमध्ये ब्रेक किंवा अन्य यांत्रिक बिघाड असल्याची चालकाने तक्रार केली नव्हती, असे अहवालात नमूद आहे. घटनेची नोंद कफ परेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघातानंतर बस टोइंग करून बॅकबे आगारात नेण्यात आली. स्कॉर्पिओ चालकाविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात टीएडी क्रमांक ७०/२०२६ नुसार १८ ऑक्टोबर रोजी नोंद करण्यात आली आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत अधिक तपशील समोर आलेला नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS