Mumbai News पूर्व उपनगरांसह ठाणे-भिवंडीत पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 October 2026

Mumbai News पूर्व उपनगरांसह ठाणे-भिवंडीत पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर संकुलातील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. हा जलाशय बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित भागांतील नागरिकांनी पुढील सात दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

जलाशय कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पाण्याच्या गुणवत्तेवर संभाव्य परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घ्यावी आणि महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई शहरातील प्रभावित विभाग - 
- ए विभाग: नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसर
- बी विभाग: संपूर्ण परिसर
- ई विभाग: संपूर्ण परिसर
- एफ दक्षिण विभाग: संपूर्ण परिसर
- एफ उत्तर विभाग: संपूर्ण परिसर

पूर्व उपनगरांतील प्रभावित विभाग - 
- टी विभाग: मुलुंड पूर्व आणि मुलुंड पश्चिम
- एस विभाग: भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व
- एन विभाग: विक्रोळी, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर
- एल विभाग: कुर्ला पूर्व
- एम पूर्व विभाग: संपूर्ण परिसर
- एम पश्चिम विभाग: संपूर्ण परिसर

ठाणे आणि भिवंडीतील नागरिकांनाही आवाहन - 
मुंबई शहर व पूर्व उपनगरांव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांत ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो, तेथील नागरिकांनीही पुढील सात दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. खबरदारीच्या सूचनांचे पालन करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS