Mumbai बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रणाची जबाबदारी विकासकांची; हयगय केल्यास कठोर कारवाई – आयुक्त अश्विनी भिडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

27 October 2026

Mumbai बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रणाची जबाबदारी विकासकांची; हयगय केल्यास कठोर कारवाई – आयुक्त अश्विनी भिडे


मुंबई JPN NEWS - मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकामस्थळे आणि लगतच्या रस्त्यांवरील धूळ रोखण्याची जबाबदारी संबंधित विकासक व बांधकाम व्यावसायिकांची आहे. या कामात हयगय किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. तसेच, वायू गुणवत्ता मापन केंद्रे आणि सेन्सर बंद असल्यास किंवा त्यांच्यावर चुकीची आकडेवारी दिसत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) बैठक झाली. या बैठकीत आयुक्त भिडे यांनी संबंधित विभागांना विविध निर्देश दिले.


उच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करा -
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोर पालन करावे. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर तसेच शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालये व न्यायालयांसारख्या शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यासंदर्भातील न्यायालयीन निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे आयुक्तांनी सांगितले.


फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावरील दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवावा. तसेच, शासकीय आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. प्रदूषण कमी करण्यासाठी हरित फटाक्यांच्या वापराबाबतही नागरिकांना जागरूक करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


२८ मार्गदर्शक सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक -
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. ही अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कामातून दिसली पाहिजे. संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी आणि उपाययोजनांची नियमित तपासणी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


बांधकामस्थळांचा परिसर स्वच्छ ठेवणे, धूळ हवेत पसरणार नाही यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि लागू नियमांचे पालन करणे ही संबंधित विकासक व बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी आहे. नियमभंग आढळल्यास तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.


वायू गुणवत्ता मापन यंत्रणा कार्यरत ठेवा -
मुंबईतील वायू गुणवत्ता मापन केंद्रे, सेन्सर आणि संबंधित यंत्रणा नियमितपणे कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. यंत्रणा बंद असणे किंवा चुकीची आकडेवारी दर्शविणे यांसारख्या बाबी गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, असे आयुक्तांनी सांगितले.


शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करावा. धूळ नियंत्रणासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबवाव्यात आणि सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने ठोस उपाययोजना करून मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.


या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे यांच्यासह सर्व परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS