Mumbai - लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेत सायन रुग्णालय आघाडीवर; तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

31 October 2026

Mumbai - लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेत सायन रुग्णालय आघाडीवर; तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया

मुंबई JPN NEWS - मुंबईतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियांच्या बाबतीत सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालय आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत एकूण ३५ लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांमध्ये टॉप आणि बॉटम सर्जरीचा समावेश आहे.

सायन रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत ३५ शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, या शस्त्रक्रिया यशस्वी किंवा अयशस्वी ठरल्या, याचे वर्गीकरण करण्यासाठी निश्चित निकष उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सायन रुग्णालयाच्या सामान्य शल्यचिकित्सा विभागाने मार्च २०२३ पासून ट्रान्सजेंडर रुग्णांवर १४ शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे केल्याची माहिती दिली आहे. ही आकडेवारी प्लास्टिक सर्जरी विभागाच्या ३५ शस्त्रक्रियांपेक्षा वेगळी असल्याने दोन्ही आकडेवारी एकत्रित समजणे योग्य ठरणार नाही.

शस्त्रक्रियेपूर्वी मानसोपचार मूल्यमापन आवश्यक -
लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेपूर्वी संबंधित व्यक्तीचे मानसोपचार मूल्यमापन महत्त्वाचे मानले जाते. सायन रुग्णालयाच्या माहितीनुसार, जेंडर डिस्फोरियाचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे की नाही, हे तपासण्यासाठी किमान दोन पात्र मानसोपचार तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

प्रजनन क्षमता आणि लैंगिक जीवनाबाबत माहिती - 
शस्त्रक्रियेनंतर प्रजनन क्षमता आणि लैंगिक जीवनासंदर्भातही आरटीआयमध्ये माहिती मागवण्यात आली होती. पुरुष ते स्त्री लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्ती गर्भधारणा करू शकत नाही, असे नायर आणि जे. जे. रुग्णालयांनी स्पष्ट केले आहे. मात्र, शस्त्रक्रियेनंतर लैंगिक जीवन शक्य असल्याचेही रुग्णालयांनी नमूद केले आहे.

नायर रुग्णालयात जन्मजात लिंगविकारांच्या ८ ते ९ केसेस - 
नायर रुग्णालयात दरवर्षी जन्मजात लिंगविषयक वैद्यकीय स्थिती असलेल्या ८ ते ९ रुग्णांची प्रकरणे उपचारासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. ही प्रकरणे लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या प्रकरणांपेक्षा वेगळी आहेत.

जनजागृती आणि वैद्यकीय सुविधांची माहिती पोहोचवण्याची गरज - 
आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांच्या मते, लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांबाबत महापालिका व राज्य सरकारने व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक व्यक्तींना अशा शस्त्रक्रियांची आवश्यकता असते; मात्र उपलब्ध उपचार आणि सुविधांची माहिती नसल्याने त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे लिंग ओळख आणि शरीर यांच्यात विसंगती जाणवणाऱ्या व्यक्तींना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे कोठारी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS