BEST बसची दोन कारला धडक, सहा जण जखमी! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2026

BEST बसची दोन कारला धडक, सहा जण जखमी!


मुंबई JPN NEWS - वडाळा लोढा जंक्शन येथे सोमवारी रात्री BEST बसच्या अपघातात सहा जण जखमी झाले. रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास सिग्नलवर थांबलेल्या BEST बसला आणि तिच्या मागे उभ्या असलेल्या अर्टिगा व क्रेटा कारला मागून येणाऱ्या दुसऱ्या BEST बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून, सर्वांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोढा जंक्शन येथील वाहतूक सिग्नलवर एक BEST बस थांबली होती. तिच्या मागे अर्टिगा आणि क्रेटा कारही उभ्या होत्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या BEST बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने प्रथम क्रेटा आणि त्यानंतर अर्टिगा कारला धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही कारचे नुकसान झाले.

अपघातात अर्टिगा कारच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच कारमधील अन्य तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. क्रेटा कारमधील एक पुरुष आणि एक महिला असे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. अशा प्रकारे एकूण सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलविण्यात आली. घटनेची अधिक माहिती तपासली जात असून, आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS