Mumbai - मुंबईतील प्रदूषण नियंत्रण कितपत प्रभावी ठरणार?, जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

01 November 2026

Mumbai - मुंबईतील प्रदूषण नियंत्रण कितपत प्रभावी ठरणार?, जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबई JPN NEWS - मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकामस्थळांवरील वायू गुणवत्ता मोजमाप सेन्सरची तपासणी करण्यासाठी महापालिकेने तृतीय संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबईतील सुमारे तीन हजार बांधकामस्थळांवरील सेन्सरची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थेकडून दररोज केवळ १२ बांधकामस्थळांची तपासणी होणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एवढ्या मर्यादित तपासणीमुळे प्रदूषण नियंत्रणाचा उद्देश कितपत साध्य होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

या तपासणीसाठी महापालिका तीन वर्षांत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपये खर्च करणार आहे. 'महाबळ एन्व्हायरो इंजिनीअर्स प्रा. लि.' या कंपनीची तृतीय संस्था म्हणून निवड करण्यात आली असून, सेन्सरची कार्यक्षमता, अचूकता, कॅलिब्रेशन आणि रिअल टाइम माहितीचे प्रसारण यांची पडताळणी केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

२२ महिन्यांच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह
बांधकामस्थळांवरील सेन्सर बसविणे आणि त्यांच्या तपासणीसंदर्भात न्यायालयाने ९ जानेवारी २०२५ रोजी आदेश दिले होते. मात्र, महापालिकेने निविदा प्रक्रिया १७ जुलै २०२६ रोजी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही निविदा प्रक्रियेसाठी तब्बल २२ महिने का लागले, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी उपस्थित केला आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबईत हजारो बांधकामस्थळे असताना दररोज केवळ १२ ठिकाणांची तपासणी करण्याचे नियोजन अपुरे असल्याची टीका आझमी यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही तपासणीची व्याप्ती मर्यादित राहणार असेल, तर या यंत्रणेचा प्रत्यक्ष फायदा किती होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाच्या आदेशानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यास झालेला विलंब आणि अपुऱ्या नियोजनाला जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईकरांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी सेन्सर बसविण्याबरोबरच त्यांची नियमित आणि व्यापक तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारली जाणारी ही व्यवस्था प्रत्यक्षात किती प्रभावी ठरणार, याकडे आता लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS