सौरऊर्जेमुळे BMC च्या वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची बचत; एका महिन्यात १.१० लाखांचा खर्च कमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

25 November 2026

सौरऊर्जेमुळे BMC च्या वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची बचत; एका महिन्यात १.१० लाखांचा खर्च कमी


मुंबई JPN NEWS - महापालिकेच्या इमारतींवरील वीजखर्च कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील आठ विविध इमारतींमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांमुळे अवघ्या एका महिन्यात वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची घट झाली आहे. मे महिन्यात २ लाख ३२ हजार ४६ रुपये असलेले एकत्रित वीजबिल जूनमध्ये १ लाख २१ हजार २८८ रुपयांवर आले. त्यामुळे एका महिन्यात तब्बल १ लाख १० हजार ७५८ रुपयांची बचत झाली आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तांमध्ये पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने जी दक्षिण विभागात १२ किलोवॅट क्षमतेचे ऑन-ग्रिड सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. वरळी स्मशानभूमी, महापालिका शाळा आणि विविध कार्यालयीन इमारतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याचे परिणाम वीज वापर आणि बिलांच्या आकडेवारीतून समोर आले आहेत.

एका महिन्यात १२ हजार युनिट्सपेक्षा अधिक विजेची बचत - 
मे २०२६ मध्ये जी दक्षिण विभागातील आठ महापालिका इमारतींचा एकत्रित वीज वापर २३,७०१ युनिट्स इतका होता. जून २०२६ मध्ये हा वापर ११,३१८ युनिट्सवर आला. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात १२,३८३ युनिट्सची घट नोंदविण्यात आली. सौरऊर्जेच्या वापरामुळे पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक दिलासा - 
वीजबिलातील घट ही केवळ पर्यावरणपूरक उपक्रमाची उपलब्धी नसून महापालिकेच्या खर्चात बचत करणारी बाब ठरत आहे. मे महिन्यात आठ इमारतींचे एकत्रित वीजबिल २ लाख ३२ हजार ४६ रुपये होते, तर जून महिन्यात ते १ लाख २१ हजार २८८ रुपये झाले. म्हणजेच एका महिन्यात १ लाख १० हजार ७५८ रुपयांचा खर्च कमी झाला.

महापालिकेच्या विविध सार्वजनिक मालमत्तांवरील वीजखर्च मोठा असतो. अशा ठिकाणी सौरऊर्जेचा वापर वाढवल्यास दीर्घकालीन आर्थिक बचतीसोबतच ऊर्जा संवर्धनालाही चालना मिळू शकते.

अन्य महापालिका इमारतींमध्येही सौरऊर्जेचा विस्तार - 
महापालिकेच्या इमारती अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प महत्त्वाचे ठरत आहेत. सार्वजनिक निधीचा कार्यक्षम वापर, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे, या उद्देशाने अशा प्रकल्पांचा विस्तार अन्य महापालिका मालमत्तांमध्ये करण्याच्या शक्यता तपासल्या जाणार आहेत.

या उपक्रमाची माहिती उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी दिली. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे होणाऱ्या बचतीचे नियमित निरीक्षण करण्यात येणार असून, महापालिकेच्या अन्य इमारतींमध्येही अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा विचार केला जाणार आहे.

महापालिकेच्या इमारतींवरील सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार झाल्यास वीजखर्चात दीर्घकालीन बचत करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण पाऊल पडू शकते.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS