मंत्री गणेश नाईकांच्या बंगल्याला आग; एसी युनिटमधून भडकली आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2026

मंत्री गणेश नाईकांच्या बंगल्याला आग; एसी युनिटमधून भडकली आग


मुंबई JPN NEWS - मंत्रालयासमोरील मंत्री गणेश नाईक यांच्या पावनगड बंगल्याला बुधवारी (११ नोव्हेंबर) आग लागल्याची घटना घडली. बंगल्यातील एसी युनिटमध्ये आग भडकली आणि त्यानंतर विद्युत वायरिंग, फर्निचर, कार्यालयीन कागदपत्रे तसेच अन्य साहित्यापर्यंत पसरली. मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

चर्चगेट येथील मंत्रालय आणि विधानभवन परिसरात मंत्र्यांचे बंगले आहेत. यापैकी मंत्री गणेश नाईक राहत असलेल्या पावनगड बंगल्यात सकाळी ११.४३ वाजता आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाने सकाळी ११.५५ वाजता या घटनेला 'लेव्हल-१' आग घोषित केले.

बंगल्याच्या तळमजल्यावरील सुमारे चार हजार चौरस फुटांच्या परिसरात आग पसरली होती. विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, स्प्लिट एसी युनिट, स्वयंपाकघरातील साहित्य, कार्यालयीन फाईल्स व कागदपत्रे, लाकडी फर्निचर, फ्रिज आणि फॉल्स सिलिंग आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांनंतर दुपारी १.२६ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS