Date 2 july 2012 पालिकेचा अंधाधुंदी कारभार - JPN NEWS 2.

Post Top Ad

JPN NEWS

Date 2 july 2012 पालिकेचा अंधाधुंदी कारभार

Share This

Date 2 july 2012
पालिकेचा अंधाधुंदी कारभार 
भारतामधील सर्वात मोठी अशी महानगर पालिका असा उल्लेख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा कारभार चांगला असावा अशी अपेक्षा मुंबई करांची असतानाच मुंबई महानगर पालिकेचा कारभार मात्र अप्रशिक्षित व अंधाधुंदी चालाल असल्याचे गेल्या काही दिवसापासून उजेडात येणाऱ्या प्रकरणावरून दिसत आहे.
     मुंबई महानगर पालिकेने घेतलेले निर्णय व पालिकेची माहिती लोकान पर्यंत पोहचवण्यासाठी जण संपर्क विभाग आहे. या विभागाच्या जन संपर्क अधिकारी पदी आता पर्यंत प्रतिष्टीत अधिकारी होते परंतु सध्या या पदावर असलेल्या जनसंपर्क अधिकारी खबाले पाटील यांच्या शिक्षणाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी माहिती अधिकारामध्ये मिळवलेल्या माहिती नुसार प्रश्न उपस्थित केला होता. व सदर अधिकारी १० वी पास व एक छायाचित्रकार असल्याचा आरोप केला होता. पालिकेमध्ये कसे सर्व आलबेल आहे हे आपल्या खास पत्रकारांद्वारे बातम्याद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम हा जनसंपर्क विभाग करत असल्यामुळे पालिकेची एकच बाजू मुंबईकरांना नेहमी दिसत आहे.
     मंत्रालायामधील आगी नंतर महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यालय मध्ये पाहणी करण्याच्या आधीच मनसेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती ही पत्रकार परिषद होणार व सत्ताधारी पालिकेतील आगी बाबत उघडे पडतील म्हणून पत्रकारांना सोबत घेऊन मनसेच्या पत्रकार परिषदेच्या १५ मिनिटे आधीच महापौरांचा अचानक पालिका मुख्यालयाल भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. मनसेने याबात नाराजीही व्यक्त करून पालिकेमध्ये आग लागल्यास प्रशासन व सत्ताधारी कशे अपयशी आहेत याचा परदा फाश केला होता.
      आता या आठवड्या मध्ये स्थायी समिती मध्ये मुंबई करांची सुरक्षा ज्या आपतकालीन व्यवस्थापन विभागावर अवलंबून आहे या विभागाचे व्यवस्थापक नार्वेकर यांच्या शिक्षणावर मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नार्वेकर हे पालिकेत सुरक्षा अधिकारी होते, बीएससी मध्ये ते तब्बल ९ वेळा नापास झाले आहेत नार्वेकर हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पी एं मिलिंद नार्वेकर यांचे नातेवाईक असल्याने त्यांना हे पद देण्यात आले असा आरोप लांडे यांनी केला आहे.
       असे आरोप झाले कि पालिकेमधील सत्ताधारी पक्षांकडून नेहमीचे म्हणजेच अनुभवाच्या जोरावर त्यांना या पदावर नेमले आहे असे उत्तर दिले जाते. मग काही मर्जी मधील व सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधलेल्या सत्ताधार्यांची हाजी हाजी करणाऱ्या अधिकार्यांसाठी जो नियम लावला जातो तो नियम इतर अधिकारी खास करून मागासवर्गीय अधिकार्यांसाठी का लावला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेमधील उच्च पदावर एखादा मागासवर्गीय अधिकारी येणार असेल तर ते पद एम. पी. एस. सी. मार्फत भरणासाठी सत्ताधारी व प्रशासनाकडून जोर दिला जातो. परंतु अशा उच्च पदावर जर आपल्या मर्जीतील एखादा बिगर मागासवर्गीय अधिकारी येणार असेल तर त्याची सरळ त्या पदावर वर्णी लावली जात आहे.
        अश्या मर्जीतील अप्रशिक्षित अधिकार्यांमुळे मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी ज्या आपतकालीन व्यवस्थापनाने प्रमुख भूमिका पार पाडली त्या विभागाने दुपारी पावणे तीन ला लागलेली आग संध्याकाळी सहा वाजता पूर्ण विझली आहे या आगी मध्ये १२ लोक जखमी झाले आहे असे अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या तोंडून पत्रकारांना सांगितले होते. वास्तविक पाहता मंत्रालायामधील आग त्यावेळी विझली सुद्धा नव्हती. तरीही खोटी माहिती पत्रकारांना देण्यात आली.ही खोटी माहिती देण्याचे कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकारामुळे पालिकेचे हसे झाले होते. जो पर्यंत पालिका प्रशासन व सत्ताधारी अंधाधुंदी कारभार करून आपल्या मर्जी मधील व हाजी हाजी करणारे अधिकारी जो पर्यंत अश्या उच्च पदावर अप्रशिक्षित अधिकारी नेमत राहणार तो पर्यंत पालिकेचे हसे होतच राहणार आहे.
अजेयकुमार जाधव 
मो ९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages