DATE- 4 june 2012 पी ई एस मधील गुंडगिरी ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 4 june 2012 पी ई एस मधील गुंडगिरी ?


DATE- 4 june  2012 
पी ई एस मधील गुंडगिरी ?
     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वाद सध्या चांगलाच गाजत आहे. मे २०१२ मध्ये धर्मादाय आयुक्ताच्या कोर्टाने प्रीतमकुमार शेगावकर, डी जे गांगुर्डे. प्रिन्सिपल पाटील यांची विश्वस्त म्हणून केलेली नियुक्ती बोगस असून बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख विश्वस्त म्हणून नेमणूक केली आहे. प्रमुख विश्वस्त म्हणून नेमणूक झाल्याने बाळासाहेब आंबेडकर पदाची सूत्रे स्वीकारण्यास गेलेल्या बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना पदभार स्वीकारन्यापासून जुन्या विश्वस्त्यानी रोखण्याचा प्रयत्न केला.
     बाळासाहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला यामध्ये महिला सह ९ कायकर्ते जखमी झाले असून त्यापैकी संतोष लोखंडे, राकेश गायकवाड,मनोज मर्चंडे, संजय किर्तीकर हे ४ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी निखिल सूर्यवंशी, अमर पिंपटकर, अरुण कांबळे या प्रमुख पदाधिकार्‍यांसह ४७ जणांना अटक केली होती. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयावर आज पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काल अटक केलेल्या ४७ कार्यकर्त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले.
   संस्थेत दादागिरी, गुंडगिरी करणार्‍या बडतर्फ सदस्यांना वेळीच आवरण्यात यावे, अशी तक्रार अँड. आंबेडकर यांनी आझाद मैदान पोलिसांत केली. न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉ. एस. पी. गायकवाड आणि एम. एस. मोरे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनावर अधिकार देण्यात आला आहे. तसेच माजी सदस्थ डॉ. डी. जे. गांगुर्डे, गंगाधर पाणतावणे आणि इतरांचे ३ मे २000 रोजी सभासदत्व नाकारले. असे असतानाही डॉ. गांगुर्डे, पाणतावणे, अँड. प्रीतमकुमार शेगांवकर, व्ही. एम. प्रधान, एस. एल. भागवत हे संस्थेमध्ये अनधिकृतपणे संस्थेच्या कारभारात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप पीपल्स एज्युकेशनचे विद्यमान अध्यक्ष एम. एस. मोरे, एस. पी. गायकवाड आणि अँड. आंबेडकर यांनी केला आहे.
     या लाठीहल्ल्या नंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त बजाज व डी.सी.पी. दोर्जे यांच्या सोबत बैठकीमध्ये सर्व कायदेशीर कागदपत्रे पाहील्यानंतर पोलिसांकडून चालढकल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. पोलिसांनी ७ दिवसांमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय परिसरातील गुंडांना कढून टाकू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
      प्रीतमकुमार शेगावकर यांच्यावर औरंगाबाद येथे वाडेकर नावाच्या प्रिन्सिपल व प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असून शेगावकर हे तिथून फरार आहेत. प्रीतमकुमार शेगावकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला २ मेडिकल व २ अभियांत्रिकी महाविद्यालये डी. वाय. पाटील संस्थेला विकली आहेत. दुसरे विश्वस्त गांगुर्डे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याच गांगुर्डे यांच्यावर पेपर फुटी प्रकरणी नेमलेल्या ल्यामिंगटन कमिशनने असा नालायक माणूस शिक्षण क्षेत्रात असता कामा नये असा शेरा मारल्याचा आरोप आहे.
      काही  काळापूर्वी याच महाविद्यालयातील प्राध्यापिका चित्रा साळुंके यांनी आय पी एस अधिकाऱ्यांना एल एल बी च्या परीक्षेत मार्क वाढवल्याचा प्रकार झाल्याचा आरोप केला होता याची चौकशी सध्या सुरु आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांमधील बडे अधिकारी अडकले आहेत. या अधिकाऱ्यांना मार्क वाढवून देण्याचे काम करण्याचे काम येथील बोगस विश्वास्थांकडून झाले आहे. नवीन विश्वस्त आल्यास या प्रकरणाची चौकशी होऊन आपण उघडे पडू याभितीने जुन्या विश्वस्तांना वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी जुन्या विश्वस्तांच्या बाजूने म्यानेज होऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला.
      या लाठीहल्ल्या दरम्यान पोलिसांनी लाठीहल्ला करण्यापूर्वीचे कोणतेही संकेत पाळले नव्हते. पोलसांनी कोणतीही शहानिशा न करता भारिपच्या कार्यकर्त्यांवर लाठीहाला केला होता. या लाठीहल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची मेडिकल टेस्ट करण्यास सुद्धा पोलीस विसरले. इतकी लापरवाही पोलिसांनी का केली याची चौकशी करण्याची गरज आहे. या लाठीहल्ल्याच्या विरोधामध्ये मानवाधिकार आयोग व न्यालायाकडे भारीप ने तक्रार दाखल केली आहे.हे प्रकरण पोलिसांवर नक्कीच शेकणार आहे. परंतु बौद्ध व मागासवर्गीयांना शिक्षण मिळून त्यांची उन्नती व्हायची असेल तर सोसायटीमधील बोगस विश्वास्तांपासून या संस्थेला वाचवण्यासाठी आंबेडकरवादी जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव 
मो.९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS