Date 22 july 2012मुंबईकरांकडून पालिकेचा निषेध
पावसाळा आली कि दर वर्षी मुंबई मध्ये रस्त्यांवर खड्डे पडल्याची बोंब असते. यावर्षी सुद्धा अशीच बोंब केली जात आहे. ही बोंब झाल्यावर मुबई महाब्नगर पालिका खड्डे बुजवण्यासाठी किती तत्पर आहे हे दाखवले जाते.त्यासाठी खोटी आकडेवारी सदर केली जायची. आता तर मुंबई करांना खरी माहिती मिळेल म्हणून आम्ही पॉट होल tryaking सिस्टीम पालिकेने आणली आहे तरीही खड्डे बुजवले जात नाहीत या कामासाठी मुंबईकर जनतेलाच पालिकेने कामाला जुंपले आहे.
पावसामुळे पडणारे खड्डे बुजविण्यासाठी १२० कोटींचे कंत्राट देण्यात आले असून २४ प्रभागांत ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी १४०० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ‘खड्डे’ भरण्यासाठी पालिकेच्या २४ विभागीय कार्यालयानुसार कंत्राट देण्यात आले आहे. प्रतिकंत्राटदार ५ कोटी अशी एकूण २४ कंत्राटदारांना १२० कोटींचे कंत्राट देण्यात आले असून ३१ मार्च २०१४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. शहर-१८, पश्चिम उपनगर-२५ आणि पूर्व उपनगर-१६ अशा एकूण ५९ निविदा प्राप्त झाल्या होत्या. पश्चिम उपनगरातील १ निविदाकार बाद ठरला. ५८ निविदाकारांपैकी ज्या २४ निविदाकारांनी कमी दराच्या निविदा भरल्या अशा ठेकेदारांना कंत्राट देण्यात आले आहे.
महापालिका रस्त्यांसाठी सातत्याने निविदा काढते. कायद्याप्रमाणे या निविदांमध्ये फार वाढ न करता त्या मंजूर करून घेणे अपेक्षित असताना पालिका १५ टक्के निविदा वाढवून देते. रस्त्यांसाठी ५५०० कोटी रुपये मंजूर करूनही दुसऱ्याच वर्षी खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा निविदा काढल्या जातात. मुंबईत पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मागील वर्षी तीव्र नाराजी व्यक्त केली होती कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यात खड्डे पडतातच कसे, असा प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी उपस्थित केला होता.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका दरवर्षी कोल्ड मिक्स तर कधी हॉटमिक्स चा वापर करून खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. मुंबईकरांकडून येणाऱ्या करामधील करोडो रुपये उधळून सुद्धा पालिकेमधील सत्ताधार्यांचे मन भरले नसल्याने पॉट होल tryaking सिस्टीम चा वापर करण्याचे पालिकेने ठरवले आहे.या software साठी पालिकेने दीड कोटी कंत्राटदाराला दिले आहेत. हे software स्वतः sattelait द्वारे न शोधता, मुंबईकरांनी खड्ड्यांचे फोटो पाठवले तरच खड्डे बुजवण्याचे काम होणार आहे.
वास्तविक पाहता पालिकेकडे मुंबईकरणा एखाद्या ठिकाणी खड्डे दिसले तर आधी पालिका कार्यलया मध्ये तक्रार दिल्यास त्याठिकाणी पालिकेचे अधिकारी कर्मचारी जाऊन खड्डे बुजवायचे आता हेच काम मुंबई कारण खड्ड्यांचे फोटो कढून हे फोटो संगणक मार्फत पालिकेच्या वेबसाईट वर पाठवावे लागत आहेत. त्यासाठी लागणारे अँण्ड्रॉईड पद्धतीचे स्मार्ट फोन सर्व मुंबईकरांकडे आहेच असे नाही. यामुळे या प्रणालीचा मुंबईकरांकडून कमी वापर होत आहे. पालिकेकडे खड्डे बुजवण्यासाठी तक्रार केल्यास तुम्ही फोटो वेबसाईटवर पाठवलेच नसल्याने आम्ही खड्डे बुजवले नाही असे उत्तर मुंबैकाराना मिळत आहेत. याचाच अनुभव पालिकेच्या स्थायी समिती सदस्य असलेल्या एका महिला नगरसेविकला सुद्धा आला आहे.
मुंबई महानगर पालिकेने घेतलेला निर्णय हास्यास्पद व चुकीचा असल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे. आमच्याकडून कर घ्यायचा यांनी तो हवा तसा खर्च करायचा, आम्ही खड्ड्यांचा त्रास होतो म्हणून आम्हीच फोटो काढायचे ते याना पाठवायचे मग या पालिकेचे अधिकारी बसून पगार खाणार का असे बोलले जात आहे. मुंबईकरांकडून काम करून घ्यायचे असेल तर पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांची गरजच काय असा संतप्त सवाल विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी उपस्थित केला आहे तर मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आणलेल्या नवीन प्रणालीचा काहीही फायदा झालेला नाही. या अँण्ड्रॉईड या चुकीच्या पद्धतीचा वापर पालिका अधिकार्यांकडून केला जात असून, हे अधिकारी आपली जबाबदारी नागरिकांवर टाकून हात झटकत असल्याचा आरोप भाजपा गटनेते दिलीप पटेल यांनी केला आहे.
पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नुकत्याच सुरू केलेल्या पॉट होल्स ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे अँण्ड्रॉईड वेस्ट टेक्नोलॉजी या माध्यमाद्वारे पालिकेच्या वेबसाईटवर पाठवून ४८ तासांमध्ये त्याची दखल घेऊन यावर कारवाई करण्याची नवीन पद्धत अवलंबली आहे, मात्र ही पद्धत चुकीची असून मुंबईतील नागरिकांवर ही जबाबदारी टाकण्यापेक्षा पालिका अधिकार्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून हे खड्डे व रस्त्याच्या दुर्दशेचा पाठपुरावा करून त्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे
महापालिका आयुक्त तसेच चार अतिरिक्त आयुक्त यांनी स्वत: अशा ठिकाणांची पाहणी करून संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी पटेल यांनी केली आहे. मुंबईत सिमेंट-क्राँक्रीटचे रस्ते याजवळील पेव्हर ब्लॉक यांची अवस्था अत्यंत खराब आहे. अशा प्रकारची परिस्थती मुंबईतील २५३ जंक्शनपैकी काही जंक्शन नादुरुस्त आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे पटेल यांनी सांगितले. दरम्यान, असा प्रकारची यादी बनवून संबंधित दोषी कंत्राटदारांवर कारवाई करावी; अन्यथा भाजपा आंदोलन करेल, असा इशारा पटेल यांनी दिला आहे. यामुळे मुंबईकराबरोबरच पालिकेमधील सत्ताधारी मित्र पक्ष, विरोधी पक्ष सर्वच या प्रणालीचा तसेच पालिका अधिकाऱ्यांना आराम देवून ज्यांच्याकडून कर घेतो त्या मुंबईकरांनाच कामाला जुंपल्याने पालिकेमधील सत्ताधाऱ्यांचा व प्रशासनाचा निषेध केला जात आहे.
अजेयकुमार जाधव
मो. 9969191363 ई मेल- jpnnews100 @gmail .com


No comments:
Post a Comment