10 सप्टेंबरपासून भुजबळांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

10 सप्टेंबरपासून भुजबळांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी

10 सप्टेंबरपासून
 भुजबळांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी 

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई एज्युकेशन ट्रस्ट निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या आरोपांच्या सीबीआयमार्फत चौकशीची मागणी करणा-या याचिकेची सुनावणी 10 सप्टेंबरपासून उच्च न्यायालयात  सुरू होणार आहे. एमईटीचे सहसंस्थापक सुनील कर्वे यांनी भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी भुजबळांविरुद्ध तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यानंतर कर्वे यांनी न्यायालयात धाव घेतल्याचा युक्तिवाद कर्वे यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी न्यायालयात केला. भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे नष्ट केल्याचा आरोप कर्वे यांनी केला आहे. पुरावे नष्ट केले जात आहेत, तसेच पोलिसही कारवाईस नकार देत असल्याने सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असे शिरोडकर म्हणाले. शहर पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत असल्याची माहिती महाधिवक्ता दारियस खंबाटा यांनी न्यायालयाला दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS