चिथावणीखोर पोस्टर्स हटवा - अबू आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

चिथावणीखोर पोस्टर्स हटवा - अबू आझमी


चिथावणीखोर पोस्टर्स हटवा - अबू आझमी



आझाद मैदानावरील हिंसाचारासंदर्भात चिथावणी देणारी पोस्टर्स शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आली असून ती तत्काळ हटवण्यात यावीत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.  
     11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर झालेला हिंसाचार निषेधार्हच आहे. तसेच हिंसाचारात सहभागी असणा-या दंगेखोरांवर कठोर कारवाई करायलाच हवी. मात्र, शिवसेना आणि भाजप हे पक्ष त्या हिंसाचाराचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांनी भावना भडकावणारी पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी लावली आहेत. चिथावणी देणारी अशी पोस्टर्स त्वरित हटवण्यात यावीत. तसेच विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आझाद मैदान हिंसाचाराचे फुटेज वारंवार प्रसारित करण्यात येत असून त्यालाही अटकाव करण्याची मागणी  आझमी यांनी  केली आहे.  
    आझाद मैदानातील परिस्थिती संयमाने हाताळल्याबद्दल आझमी यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांचे कौतुक केले आहे. दंगेखोरांना जरूर अटक करा; पण निदर्शनांत सहभागी असणा-यांचे सरसकट अटकसत्र राबवू नये, अशी मागणीही आझमी यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS