11 August 2012 News - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2012

11 August 2012 News


गुजरातपेक्षा बिहारमध्ये चांगले शासन आहे. 
नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घोषित केली असली तरी खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच त्यांना भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ‘उत्कृष्ट मुख्यमंत्री’ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुजरात आणि बिहार या दोन राज्यांतील विकासाची तुलना करताना बिहारला झुकते माप दिले आहे. गुजरातपेक्षा बिहारचे विकासाचे मॉडेल उत्तम आहे. याआधी गुजरातचे नाव आघाडीवर जरूर होते, पण नितीशकुमार यांनी उत्कृष्ट काम करून बिहारमध्ये बदल घडवून आणलाय, असे त्यांनी सांगितले.नरेंद्र मोदी हे संघाचे जुने स्वयंसेवक आहेत. कट्टर हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा असून ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र ‘रालोआ’मधून त्यांच्या नावाला मोठा विरोध असून त्यात नितीशकुमार हे आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत संघानेच मोदी यांच्या तुलनेत त्यांना सरस ठरवलेय, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

गिरणी कामगाराच्या मोर्चाची जय्यत तयारी

मुंबई- १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना मोफत घरे मिळालीच पाहिजेत, या मागणीसाठी १४ ऑगस्ट रोजी गिरणी कामगार मंत्रालयावर धडक देणार आहेत. या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून जिल्ह्या जिल्ह्यात सभांचे आयोजन करण्यात येत असून महाराष्ट्रभरातील गिरणी कामगार या मोर्चात सामील होणार आहेत.
गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाच्या नुकतीच पार पडलेली लॉटरी पद्धती सदोष आहे. यामुळे गरजू कामगारांवर अन्याय झाला असून घरांच्या ठरविण्यात आलेल्या ७ लाख ५० हजार रुपये किमतीबाबत कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत १४ ऑगस्ट रोजीच्या मोर्चाद्वार राज्य सरकारकडे न्याय मागितला जाणार असल्याचे गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर यांनी सांगितले. कामगारांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी कणकवली येथील मंगल कार्यालय येथे सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपस्थित होते. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील गणेश भुवन येथे झालेल्या सभेत माजी आमदार बजरंगअण्णा देसाई हे उपस्थित होते. चिपळूण, सातारा भागातही सभा झाल्या असून हा सभांचा धडाका अन्य जिल्ह्यांमध्येही सुरू आहे. हे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर, के. एम. कोल्हे, कामगार कल्याणकारी संघाचे किशोर देशपांडे, हेमंत राऊळ, प्रकाश नाईक, आनंद मोरे, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी, सर्व श्रमिक संघाचे बी. के. आंबे्र, मुंबई कामगार ट्रेड युनियनचे शिवाजीराव देशमुख हे कामगारांमध्ये जनजागृती करीत आहेत.

इंदू मिल जागेसाठी कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने
मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलेल्या चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत निदर्शने केली. इंदू मिलच्या जागेबाबत १५ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा राज्यभरात जेल भरो आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. यावेळी आरपीआयचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्याम निकम यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना इंदू मिलच्या जागेबाबतचे निवेदन दिले. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांनी न दिल्याने शशिकांत लोखंडे, बाळ आडांगळे, आशा जाधव आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी इंदू मिलची जागा मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कुर्ला पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. १५ ऑगस्टपर्यंत इंदू मिलच्या जागेबाबत निर्णय न घेतल्यास आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर जेल भरो आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.  


बसखाली चिरडून एकाचा मृत्यू


विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजजवळ शुक्रवारी रात्री उशीरा ३३० क्रमांकाच्या बस खाली येऊन ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला अपघातानंतर बसचालक पळ काढत असल्याचे लक्षात येताच लोकांनीबसचा पाठलाग करून बस थांबवली मात्र बस खाली येऊन हा अपघात झाला नसल्याचे चालकाचेम्हणणे आहे याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून बेस्टचे अधिकारी घटनास्थळीरवाना झाले आहेत तरुणाचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत मृताचीओळख पटली नव्हती दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे 


परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी अंत्यसंस्कारांसाठी सीएनजी दाहिन्या
महापालिकेतील शिवसेना-भाजप-रिपाइं सत्ताधारी युतीने स्मशानांतील अंत्यसंस्कार मोफत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता मुंबईतील सर्व स्मशानभूमींमध्ये सीएनजी दाहिन्या बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून यासह करण्यात येणार्‍या उपाययोजनांमुळे स्मशानभूमीसभोवतालचा परिसर प्रदूषणमुक्त होणार आहे.
मुंबईत सीएनजी स्मशानभूमी सुरू करण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आल्याचे सभागृहनेते यशोधर फणसे यांनी सांगितले. सीएनजी स्मशानभूमीची सुरुवात गोरेगाव येथील आरे कॉलनी तसेच कांदिवली येथील वडारपाड्यापासून होणार असून त्यापाठोपाठ अंधेरीतील आंबोली स्मशानभूमी तसेच वर्सोव्यात सीएनजी दाहिन्या बसविल्या जाणार आहेत. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे फणसे म्हणाले.
        मुंबईत १८२ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी ४६ या खासगी, १२५ महापालिकेच्या असून ११ स्मशानभूमींत विद्युत दाहिन्या आहेत. यापैकी सात स्मशानभूमी या संयुक्त असून हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्‍चनधर्मीयांचे अंत्यसंस्कार केले जातात. मुलुंड नागरिक सेवा संघाच्या खासगी स्मशानभूमीत सीएनजी गॅसद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानभूमीत विद्युत दाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी महापालिकेला दोन हजार रुपये खर्च येतो. लाकडाद्वारे अंत्यसंस्कारासाठी १७०० रुपये महापालिकेला मोजावे लागतात. सीएनजीमुळे हा खर्च केवळ पावपट म्हणजे ५७५ रुपये खर्च येणार आहे. हा पर्याय पूर्णत: प्रदूषणमुक्त असल्याने पर्यावरणाची हानीही टळणार आहे.

रिक्षाचालकही उतरणार खड्ड्यांविरोधात

पाऊस कमी पडला तरीही रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या वाढतच आहे हेखड्डे बुजवण्याचे पालिका कितीही आश्वासन देत असली तरी त्यात तीळमात्रही फरक पडत नसल्याचेआढळून येते या रस्त्यांविरोधात विरोधी पक्ष आवाज उठवत असताना आता रिक्षाचालकांनीहीत्याविरोधात बाह्या सरसावल्या असून हे खड्डे न भरले गेल्यास प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा आणिरास्ता रोकोचा इशारा रिक्षाचालक युनियन संघटनेने दिला आहे 
   शहरातील पूर्व आणि प ​ ‌ श्चिम उपनगरातील खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांचे प्रचंड नुकसान होतअसल्याची भूमिका मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने घेतली आहे टायर फुटणे वायर तुटण्यापासूनअनेक प्रकार घडत असल्याने अनेकदा रिक्षा दुरुस्तीसाठी बंद ठेवाव्या लागतात त्यामुळे आर्थिकनुकसान होत असल्याने पालिकेचे त्याकडे लक्ष वेधण्याचा निर्णय युनियनने घेतला

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS