आसाम ब्राम्हदेशा विरोधात निदर्शनाला हिंसक वळण
हिंसाचारात दोन ठार
सीएसटी परिसरात जाळपोळ, लाठीचार्ज









आसाम आणि म्यानमारमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे दोन ठार, तर 54 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 41 पोलिसांचा समावेश आहे. दुपारी चारच्या सुमारास पेटलेला हा हिंसाचार निवळला असून परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे. सीएसटीसमोरील आझाद मैदानात आसाम आणि म्यानमारमधील अत्याचाराच्या निषेधार्ध रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांनी आझाद मैदानवर निदर्शने करण्यात येत होती
सीएसटी प्रकरण सुनियोजितपणे घडवण्यात आलं होतं का? त्यामागे नेमका कुणाचा हात आहे? याचा तपास आता क्राईम ब्रान्च करणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी २० संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
हिंसाचारात दोन ठार
सीएसटी परिसरात जाळपोळ, लाठीचार्ज
जनतेने शांतता राखण्याचे आवाहन
मुंबई / अजेयकुमार जाधव
आसाम आणि म्यानमारमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे दोन ठार, तर 54 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 41 पोलिसांचा समावेश आहे. दुपारी चारच्या सुमारास पेटलेला हा हिंसाचार निवळला असून परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे. सीएसटीसमोरील आझाद मैदानात आसाम आणि म्यानमारमधील अत्याचाराच्या निषेधार्ध रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांनी आझाद मैदानवर निदर्शने करण्यात येत होती
ही निदर्शने सुरु असताना दुपारी निदर्शन करणाऱ्या जमावाने अचानक आझाद मैदान परिसरातील वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात करून वाहनांना आगी लावण्यास सुरुवात केली. आंदोलक हिंसक बनले आणि जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. परंतु अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि सौम्य लाठीचार्ज करून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
या जमावाने पोलीस आणि रस्तावरून येजा करणाऱ्या लोकांना टार्गेट करत हल्ले केल्याने पोलीस आणि सामान्य नागरिक यामध्ये जखमी झाले आहेत.हिंसक जमावाने दगडफेक केली. तसेच बेस्टच्या बसेसे आणि मिडीयाच्या वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाने टीव्ही9, पी7 आणि एबीपी या वृत्तवाहिन्यांच्या ओबी जाळल्या. पोलिसांच्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. जखमींचा आकडा
54 पर्यंत गेला आहे. जेजे रुग्णालय, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. पत्राकांवारही या जमावाने योग्यरीत्या वृत्तसंकलन केले नसल्याचा आरोप करत हल्ले केले यामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारही जखमी झाले आहेत. काही पत्रकारांचे क्यामेरांची तोडफोड करण्यात आली आहे.
सायंकाळी चारच्या सुमारास हा सुमारे १० हजाराच्या या जमावातील काही आंदोलनकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. परिसरात उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यात आल्या. काहींना आग लावण्यात आली. पोलिसांची 3 वाहने,
25 बस, ३ वृत्तवाहिन्यांची प्रक्षेपक वाहनेही त्यात लक्ष करण्यात आली. आजुबाजूच्या इमारतींच्या काचा फोडण्यात आल्या. या हिंसक होत चाललेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतही जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहता पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. हवेत गोळीबार केला.
यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला आणि आंदोलक पांगले, या घटनेनंतर परिसरातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. निदर्शकांनी सीएसटी रेल्वे स्थानकातही निदर्शने केल्याने ४ वाजता रेल्वे सेवा थांबवण्यात आली होती. सध्या मिळालेल्या माहिती नुसार आझाद मैदान परिसरात पुन्हा वर्दळ सुरु झाली असून रेल्वे सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे
परिसरात एस आर पी एफ, आर एं एफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात असल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले आहे. दरम्यान गृह मंत्री आर आर पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, अतिरिक्त आयुक्त देवेन भारती यांनी जनतेने शांतता पाळण्याचे व अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. मुंबई सह महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
या घटनेचा अहवाल केंद्र सरकारने मागितला आहे. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारला देण्यात आले आहे. दंगल नेमकी कशी उसळली, मोर्चामध्ये कोणी प्रक्षोभक भाषणे केली, इत्यादी गोष्टींचा तपास करण्यात येणार आहे. या घटनेची केंद्राने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आसाममध्ये हिंसाचार होतो. त्याच्या निषेधार्थ हजारो किलोमीटर दूर मुंबईत मोर्चा काढण्यात येतो. या मोर्चाला हिंसक वळण लागते. देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय चिंताजनक आणि गंभीर आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.


No comments:
Post a Comment