इजिप्तमध्ये 21 वर्षीय महिला पत्रकाराला विवस्त्र करून मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2012

इजिप्तमध्ये 21 वर्षीय महिला पत्रकाराला विवस्त्र करून मारहाण


इजिप्तमध्ये 21 वर्षीय महिला पत्रकाराला विवस्त्र करून मारहाण





इजिप्तची राजधानी कैरो येथील तहरीर चौकात एका महिला ब्रिटिश पत्रकाराला जमावाने विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. एका बाजूला इजिप्तच्या राष्‍ट्राध्यक्ष पदाचे निकाल जाहीर होत होते तर दुसरीकडे या  महिला पत्रकाराचे जमावाकडून भर रस्त्यावर शोषण केले जात होते.

'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय नताश स्मिथ तहरीर चौकात वृत्त संकलन करण्‍यासाठी गेली होती. ती माहिती घेत असतानाच जमाव तिच्यावर तुटून पडला. तिच्या अंगावरचे कपडे फाडले. तिला विवस्त्र करून तिच्यावर अत्याचार केला. ब्रिटनमधील एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार नताशाने दोन जणांच्या मदतीने बुरखा परिधान करून तेथून निघून गेली होती.  

गत रविवारी ही घटना घटली. इजिप्तच्या राष्‍ट्राध्यपदी मोहम्मद मुर्सी यांची निवड झाल्याने विजयोत्सव साजरा होत होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

'सीबीसी न्यूज'ची लारा लोगनवरही 2011 मध्ये हल्ला झाला होता. इजिप्तची पत्रकार मोना एल्टाहवेवर गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला होता.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS