राजपत्रित अधिकारी महासंघाची 29 ऑगस्टला बैठक
मुंबई- केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच्या सरकार निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी इत्यादी मागण्यांसंदर्भात विचारविनमय करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक 29 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोरील नवीन प्रशासकीय भवनात दुपारी 3 वाजता होणार आहे.
अराजपत्रित कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनान्वये बदल्या करणे, ओळखपत्रे असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मंत्रालयातील प्रवेश सुलभ करणे, औरंगाबादमध्ये होणारे महिला अधिवेशन, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे झालेले दस्तऐवजांचे नुकसान आदी मुद्दे या बैठकीत विचारात घेतले जाणार आहेत, असे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment