शेल्टर डॉन बॉस्कोचे "प्रोजेक्ट २५" - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2012

शेल्टर डॉन बॉस्कोचे "प्रोजेक्ट २५"


शेल्टर  डॉन बॉस्कोचे "प्रोजेक्ट २५"
मुंबई / प्रतिनिधी 
Shelter_Don_Bosco_1.JPG
शेल्टर  डॉन बोस्कॉ ने २५ व्या वर्षात पदार्पण केल्याने रौप्याम्होत्सावी वर्षानिमित्त "प्रोजेक्ट २५" या कार्यक्रमाची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये प्रेस क्लब मुंबई येथे करण्यात आली. या प्रसंगी अभिनेते बोमन इराणी, अभिनेत्री दीपाल शाव व भारतीय हॉकी गोलकीपर रंजन नेगी उपस्थित होते.
     या प्रोजेक्ट २५ चे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी शेल्टर डॉन बोस्को, वडाळा येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे तर २ मार्च २०१३ रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. "प्रोजेक्ट २५" मध्ये  रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे पुनर्वसन करून त्यांना शिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी ५ सप्टेंबरला स्नेह मेळावा, २ ऑक्टोंबर ला शांतात मार्च, २३ नोवेंबर ला सिल्वर ज्युबली मेळावा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे फादर रॉजर जोन्स यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS