लीझ जमिनींवरील अतिक्रमणांना पालिकेचा लगाम / - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2012

लीझ जमिनींवरील अतिक्रमणांना पालिकेचा लगाम /


लीझ जमिनींवरील अतिक्रमणांना पालिकेचा लगाममुंबई - महापालिकेने लीझ जमिनीवरील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. यानुसार जमीनधारकाला पालिकेला द्याव्या लागणार्‍या हस्तांतरण शुल्कात वाढ करून ते ५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या जमिनीवर पूर्वपरवानगीशिवाय तसेच अनधिकृतरीत्या बांधकाम झाल्यास आकरण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. 
लीझवरील जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात वाढ करणारा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष डॉ. राम बारोट यांनी मंजूर केला. हस्तांतरण शुल्कात वाढ करताना त्यावर दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ करण्यास सदस्यांनी विरोध दर्शवला. याचा भुर्दंड या जमिनीवर बांधण्यात आलेल्या इमारतीतील रहिवाशांना सोसावा लागेल, असा आक्षेप सदस्यांनी नोंदविला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS