वरळी येथील लुम्बिनी बुद्ध विहार ठरल्या ठिकाणी बांधून देण्यास विकासकाचा नकार

फोटो - मुकेश धावडे
मुंबईत कचऱ्यांचे ढीग लागलेले असतानाच या कचऱ्यावरून झालेला नवा गैरव्यवहार पुढे येत आहे. कचऱ्याचे डबे ठेवण्यासाठी कॉंक्रिटचे फलाट बांधल्याचे दाखवून महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंत्राटदाराने पैसे उकळले आहे.
आर मध्य आणि उत्तर प्रभाग समितीच्या बैठकीत कचऱ्याचे डबे ठेवण्यासाठी रस्त्यावर कॉंक्रिटचे फलाट बांधण्याचा निर्णय गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार कामाचे कंत्राट खासगी कंत्राटदारालाही देण्यात आले; परंतु जेमतेम दोन-तीन ठिकाणी फलाट बांधून कंत्राटदार पसार झाला. मात्र, सर्वच ठिकाणी फलाट बांधल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आर मध्य विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता एस. आर. मिस्त्री यांनी दिले. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर कंत्राटदाराने न केलेल्या कामाचे पैसेही पालिकेकडून वसूल केले असल्याची धक्कादायक माहिती मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत दिली. या प्रकरणाची गंभीर दखल उपायुक्त भरत मराठे यांनी घेतली असून याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस, पालिका, गृह निर्माण अधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट
बौद्ध लोकांना विकासकाच्या धमक्या
मुंबई / अजेयकुमार जाधव
वरळी डॉ ई मोजेस रोड येथील पंचशील को ऑप हौसिंग सोसायटीचा पुनर्विकास केला जात आहे.गेली १० टे १२ वर्षे या विभागात महमद भाई लोखंडवाला या विकासकाच्या माध्यमातून काम सुरु असून ठरल्याप्रमाणे तीन इमारती बांधल्या असल्या तरी गेली ३० ते ३५ वर्षे येथे असलेले लुम्बिनी बुद्ध विहार पुन्हा त्याच जागी बांधण्यास विकासक टाळाटाळ करत असल्याने येथील बौद्ध धर्मियात संतापाची लाट पसरली आहे.
विकासकाने ज्या प्रमाणे नियोजित जागेत नवीन ३ इमारती बांधल्या आहेत. पूर्वी लुम्बिनी बुद्ध विहार होते त्याच ठिकाणी संक्रमण शिबिराची इमारत बांधली होती. विकासकाने केलेल्या करारानुसार बुद्ध विहार संक्रमण शिबिराची इमारत तोडून दर्शनीय जागेत बांधावयाचे होते. परंतु विकासकाने काही समाज कंटकांना हाताशी धरून बुद्ध विहाराची जागा बदली व इमारत क्रमांक २ च्या भिंतीला चिकटून बुद्ध विहार बांधण्यात आले आहे.या बुधाविहाराच्या समोरच पाण्याच्या टाक्या बाजूला विजेचे पावर हाउस असल्याने तसेच इमारतीमधून कचरा, सांड पाणी,टाकल्यास वाद निर्माण होणार असल्याने येथील लोकांनी या बांधकामास विरोध केला होता.
याउलट येथील रस्त्यावर असलेले साईबाबा मंदिर अतिशय भव्य दिव्य भागात बांधण्यात आले आहे.याबाबत विकासकाशी येथील रहिवाश्यांनी संपर्क साधला असता विकासकाने करार नाम्या प्रमाणे बुद्ध विहार होते त्याच ठिकाणी बांधण्यास नकार दिला आहे. याप्रकारची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री, गृह मंत्री,गृह निर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु अद्याप कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही.
माहिती अधिकारामध्ये पालिका व गृहनिर्माण विभाग यांच्याकडून माहिती मागितली असता विकासकाकडून दिलेल्या चुकीच्या लेखी माहितीची शहानिशा न करताच माहिती अधिकाराचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. यामुळे पालिका व गृह निर्माण भवन विभागातील अधिकारी विकासकाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला असून रहिवाश्यांनी तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान सध्या येथील रहिवाश्यांनी ज्या ठिकाणी जुने बुद्ध विहार होते त्याच ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापन केली असल्याने बुद्ध विहार होते त्याच ठिकाणी बांधावे अशी मागणी करणाऱ्या रहिवाश्यांना धमक्या मिळत आहेत. पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस सुद्धा रहिवाश्यानाच तुमच्यावरच गुन्हे दाखल करून कारवाही करू अश्या धमक्या देत असल्याने येथील रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
‘टीम अण्णा’ बरखास्त
यूपीएचे सरकार काही केल्या जनलोकपाल आणायलाच तयार नाही. मग आम्ही किती वेळा आणि किती काळ उपोषणे करायची, असा उदिग्न सवाल करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज ‘टीम अण्णा’ बरखास्त करून टाकली. आपल्या ब्लॉगवर त्यांनी ही घोषणा केली आहे. शुक्रवारी जंतर मंतर येथील उपोषण सोडताना जाहीर केल्याप्रमाणे आपला राजकीय पक्ष कधी स्थापन होणार हे अण्णांनी काही स्पष्ट केले नाही, पण टीम अण्णाची बरखास्ती हे त्या दिशेने टाकलेले त्यांचे पहिले पाऊल मानले जाते. टीम अण्णाची स्थापना ही ‘जनलोकपाल’साठी लढा देण्यासाठी झाली होती. यापुढे सरकारशी कोणतीही चर्चा न करता ती लढाई राजकीय पातळीवरून लढवली जाणार आहे.
राज्यमंत्री देवकर यांना राजीनामा देण्याचे आदेश
घरकुल प्रकरणातील आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘सोमवार दुपारपासून देवकर यांच्याशी संपर्क होत नव्हता. संध्याकाळी त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले’, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली.
घरकुल प्रकरणी २१ मे रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने देवकर यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना देवकर यांचा जामीन नामंजूर करण्यात आला. याशिवाय पोलिसांनी देवकर यांचा ताबा घेण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

राज्य सरकारब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करण्यास आमिर खान इच्छुक
मुंबई - राज्यातील 70 नद्या दूषित झाल्या असून या नद्यांच्या जलशुद्धीकरणाची मोहीम राज्य सरकार हाती घेणार असून यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आमिर खान काम करण्यास इच्छुक असल्याचे समजते. पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी नुकतीच आमिर खान याची याबाबतीत भेट घेऊन त्याच्याशी चर्चाही केली.
आमिर खानने त्याच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात दूषित नद्यांचा मुद्दा उपस्थित करत परदेशात नद्यांच्या किनारी बगिचे बनवून नद्या प्रदूषित होण्यापासून वाचवत टुरिजमला वाव दिल्याचे सांगितले होते. राज्यातीलही 70 च्या आसपास नद्या सांडपाणी आणि कारखान्यांमधून सोडण्यात येणा-या दूषित पाण्यामुळे प्रचंड प्रदूषित झालेल्या आहेत. यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाण्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. केंद्राने संपूर्ण देशात नदीजोड प्रकल्प सुरू केला आहे परंतु नदी जोडऐवजी नद्यांचे सुशोभीकरण केल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असे पाणीपुरवठा विभागाला वाटत असल्याचे विभागातील अधिका-याने सांगितले.

पालिकेने फलाट बांधले कोणी नाही पाहिले
मुंबईत कचऱ्यांचे ढीग लागलेले असतानाच या कचऱ्यावरून झालेला नवा गैरव्यवहार पुढे येत आहे. कचऱ्याचे डबे ठेवण्यासाठी कॉंक्रिटचे फलाट बांधल्याचे दाखवून महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंत्राटदाराने पैसे उकळले आहे.
आर मध्य आणि उत्तर प्रभाग समितीच्या बैठकीत कचऱ्याचे डबे ठेवण्यासाठी रस्त्यावर कॉंक्रिटचे फलाट बांधण्याचा निर्णय गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार कामाचे कंत्राट खासगी कंत्राटदारालाही देण्यात आले; परंतु जेमतेम दोन-तीन ठिकाणी फलाट बांधून कंत्राटदार पसार झाला. मात्र, सर्वच ठिकाणी फलाट बांधल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आर मध्य विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता एस. आर. मिस्त्री यांनी दिले. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर कंत्राटदाराने न केलेल्या कामाचे पैसेही पालिकेकडून वसूल केले असल्याची धक्कादायक माहिती मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत दिली. या प्रकरणाची गंभीर दखल उपायुक्त भरत मराठे यांनी घेतली असून याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:
Post a Comment