ठाणे रायगडमध्ये २ गोविंदाचा मृत्यू
ठाण्यातील पाचपाखाडी येथील संघर्ष प्रतिष्ठानच्या उत्सवात दीपक तुपे (35) या गोविंदाचा श्वास कोंडून मृत्यू झाला, तसेच रायगड जिल्ह्यातही एक गोविंदा मृत्युमुखी पडल्याने दहीहंडीच्या महाउत्सवाला गालबोट लागले. मुंबईत "थरावर थर' चढविताना मानवी मनोरे कोसळल्यामुळे २८५ गोविंदा जखमी झाले.
ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घ़डली. दीपक तुपे (३२) असे या गोविंदाचे नाव आहे. तो कुर्ल्याच्या हनुमान क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकाचा कार्यकर्ता होता. नवी मुंबईत २० गोविंदा जखमी झाले . दिवाळे गावातील भजनी मंडळांनी उभारलेल्या दहीहंडीच्यादोरीचे टोक लावलेला विजेचा खांब पडल्याने तिघे किरकोळ जखमी झाले .
दहीहंडी खेळताना गोविंदा पथकातील एका गोविंदाचा सहाव्या मानवी थरावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील दिगी गावात आज (शुक्रवार) दुपारी घडली. तर, रायगड, मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या असलेल्या दहिहंडीदरम्यान शेकडो गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुर्वास पाटील (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव आहे. सहाव्या थरावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दहीहंडी साजरी
मुंबईत सकाळी ९ पासूनच गोविंदा पथकांचे जथ्थे ट्रक, बस, चारचाकी वाहने, मोटारसायकलींच्या ताफ्यासह बाहेर पडू लागले. त्यानंतर जागोजागी हंड्या फुटायला सुरुवात झाली. दादरच्या सुविधा गल्लीतील मानाच्या हंड्या आणि "आयडियल'समोरची महिलांची हंडी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तेथे वृत्तवाहिन्यांनी सकाळपासूनच "फिल्डिंग' लावली होती. काळाचौकी, माझगाव, परळ, एल्फिन्स्टन रोड, वरळी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर अशा अनेक ठिकाणी मोठमोठ्या रकमेच्या उत्तुंग हंड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या हंड्या गोविंदा पथकांनी सहा ते आठ थर लावून फोडल्या किंवा सलामी देऊन बक्षिसे जिंकली. थरांच्या थरारात महिला गोविंदा पथकेही मागे नव्हती.


No comments:
Post a Comment