पालिकेची फसवाफसवी
मुंबई महानगर पालिकेमध्ये तब्बल १९ हजार पदांचा मागासवर्गीयांचा अनुशेष बाकी आहे ही पदे भरावयाची असतानाही पालिकेमध्ये एस सी एस ती आयोगाचे सदस्य भेट द्यायला आले असता तत्कालीन पालिका आयुक्त सुबोधकुमार यांच्या टीम ने पालिकेमध्ये मागासवर्गीयांचा कोणताही अनुशेष बाकी नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणले होते. या मुळे पालिकेमध्ये मागासवर्गीयांची १९ हजार पदे भरावयाची असतानाही आयोगाची फसवणूक केल्याने ही पदे भरावयाची बाकी असल्याचे लपवण्यात आले होते. पालिकेने केंद्र सरकार कडून आलेल्या एस सी एस ती आयोगाची फसवणूक केली असताना पुन्हा राष्ट्रीय सफाई आयोगाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य शौराज जीवन यांनी पालिकेला भेट दिली यावेळी त्यांनी पालिकेमध्ये सफाई कामगारांना कोणत्या सुविधा देतात याची माहिती घेतली तसेच सफाई कर्मचाऱ्यांना तें राहत असलेल्या वसाहती मध्ये कोणत्या अडचणी आहेत याची माहिती जाणून घेतली. यावेळी २६ लाख लोक आजही खुल्या नाल्यांचा वापर मलमूत्रासाठी करत आहेत. या २६ लाख लोकांचे मलमूत्र आजही २ लाख ९ हजार लोक उचलत आहेत असे त्यांनी सांगितले. पालिका वसाहती मध्ये पालिकेच्या सफाई कामगारांना पाण्याची व्यवस्था नाही, वसाहती मधील इमारतींना गळती लागली आहे, या वसाहतींच्या इमारतींची दयनीय अवस्था झाली असून वसाहतीच्या परिसरात साचलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.
याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी झालेल्या बैठकीत जीवन यांनी हे मुद्दे मांडून त्वरित कारवाही करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. याचा वेळी पालीकामधील सफाई कामगारांच्या रिक्त पदांबाबत मुद्दा उपस्थित झाला असता पालिकेने फक्त ३७६ पदेच रिक्त असल्याचे जीवन यांना सांगण्यात आले. या बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदे वेळी शौराज जीवन पालिका अतिरिक्त अडतानी पत्रकारांना संबोधित करत असतानाच पत्रकार परिषदेवेळी उपस्थित असलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधीकार्र्यानी प ालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची १९९२ पासून पालिकेमध्ये सफाई कामगारांची भारती झाली नसून त्यामुळे १३ हजार पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणले असता पालिकेच्या वतीने सारवा सारव करत दरवर्षी ११०० पदे रिक्त होतात ती लगेच भरली जातात. त्यामुळे एवढी पदे भरली जात नाहीत हा आरोप चुकीचा असल्याचे जीईवन यांना सांगितले असले तरी पत्रकार परिषदे मधेच १३ हजार पदे रिक्त असल्याचे एका कर्मचार्यांच्या एका संघटनेने निदर्शनास आणल्याने पालिकेचे पितळ उघडे पडले आहे.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे जीवन यांना यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये भारतात केंद्र सरकार व न्यायालयाच्या आदेशांतर्गत बंदी असतानाही पंढरपूर मध्ये आशादी एकादशीचे वारी दरम्यान डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे अमानवीय काम सफाई कामगारांना करावे लागते. ही अनिष्ट प्रथा बंद करणाऱ्या १९९३ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला द्यावेत अशी मागणी करताना सफाई कामगारांच्या हिताच्या विविध मागण्या जीवन यांच्या समोर मांडण्यात आल्या आहेत. यावर जीवन यांनी पालिकेला सफाई कामगार्न्च्या विविध माग्न्याय बाबत त्वरित कारवाही करून तीन महिन्यात कारवाही करावी असे निर्देश दिले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सफाई कर्मचार्यांच्या समस्यांबाबत तीन महिन्यात कार्यवाही न झाल्यास आपण कडक शिस्तीचे असून फसवणूक आपल्याला चालत नसल्याचे सांगत पालिका अधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेत सुनावले आहे.
या सर्व प्रकाराची माहिती प्रथापित मिडियाने लपवली असली तरी सफाई कर्मचारी हे खास करून मागासवर्गीय असल्याने त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालिकेमध्ये जेव्हा जेव्हा जातीयवाद केला जतो किवा मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार होतो त्याला लोकान समोर सतत आण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पालिकेमध्ये मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असताना एस सी एस टी आयोगाची जशी पालिकेने फसवणूक केली होती तशीच फसवणूक आता राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची करण्यात आली आहे. पालिका अशी सतत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांबाबत विविध प्रश्न व समस्यांवर फसवणूक करत असताना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नावाने दुकाने उघडून बसलेल्या युनिअनवाल्यांचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलेच दिसत आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment